फिरोज, गोविंद, गोपाळ, रवी, भालचंद्र या पाच रहिवाशांनी स्वत:च्या अंगणात तांबडा भोपळा लावला आहे. कोणत्या रहिवाशाने किती आकाराचा भोपळा पिकवला आणि तो ते कशासाठी वापरणार आहेत, हे तुम्हाला शोधायचे आहे.
भोपळ्याचा आकार (व्यास)- ३४ सेंमी, ३५ सेंमी, ३६ सेंमी, ३८ सेंमी, ४० सेंमी.
भोपळ्यांचे वापर (अनुक्रमाने नाही)- सूप, मिठाई, फुटबॉल, आकाशकंदील, पिकवण्यासाठी.
१) फिरोझ यांचा भोपळा सूप बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भोपळ्यापेक्षा १ सेंमीने छोटा आहे.
२) सर्वात मोठय़ा आकाराचा भोपळा फुटबॉल बनवण्यासाठी वापरला जातो असे गोविंद यांना वाटते; ज्यांना तेवढा मोठा भोपळा पिकवता आलेला नाही.
३) आकाशकंदील बनवण्यासाठी वापरला जाणारा भोपळा गोपाळ यांनी पिकवलेल्या भोपळ्यापेक्षा २ सेंमीने मोठा आहे.
४) रवी यांनी त्यांचा भोपळा पिकवण्यासाठी तसाच ठेवला आहे.
५) भालचंद्र यांचा भोपळा मिठाई बनवण्यासाठी वापरलेला नाही.
कसे सोडवाल?
१) रवी यांनी भोपळा पूर्ण पिकण्यासाठी ठेवला आहे.
२) ४० सेंमी भोपळ्याचा फुटबॉल बनेल.
३) आकाशकंदील बनवण्यासाठी वापरला जाणारा भोपळा हा गोपाळ यांच्या भोपळ्यापेक्षा २ सेंमीने मोठा आहे. म्हणजे गोपाळ यांचा भोपळा ३६ सेंमीचा असला पाहिजे आणि ३८ सेंमीचा भोपळा आकाशकंदील बनवण्यासाठी आहे.
४) दुसऱ्या क्ल्यूनुसार सर्वात मोठा भोपळा गोविंद यांचा नाही. पहिल्या क्ल्यूनुसार फिरोझ यांचा भोपळाही ४० सेंमी नाही (म्हणजेच सर्वात मोठा नाही. कारण तो सूप बनवण्याच्या भोपळ्यापेक्षा १ सेंमीने छोटा आहे.) त्यामुळे चौथ्या क्ल्यूनुसार भालचंद्र यांचा भोपळा ४० सेंमी आहे.
५) रवी यांचा भोपळा पूर्ण पिकण्यासाठी ठेवला आहे आणि फिरोझ यांचा भोपळा सूप बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भोपळ्यापेक्षा १ सेंमीने छोटा आहे. त्यामुळे आकाशकंदील बनवण्यासाठी वापरलेला ३८ सेंमीचा भोपळा गोविंद यांचा आहे.bm01