इशिकाचे आजी-आजोबा बडोद्याला राहतात. त्यामुळे यावर्षी संक्रांतीसाठी इशिका बडोद्याला गेली होती. तिकडे मकर संक्रांतीच्या सणाला बरेच जण ‘उत्तरायण’ असं म्हणत होते. इशिकाच्या आजीकडे तिळगूळ, हलवा, गुळपोळी हे सगळं तर होतंच; पण अजून एक ‘उत्तरायण स्पेशल’ गोष्ट होती, ती म्हणजे पतंग! गुजरातमध्ये उत्तरायणाच्या वेळी पतंग उडवण्याचा खेळ खूपच उत्साहात खेळला जातो. इशिकाही तिच्या मामाबरोबर पतंग खरेदी करायला गेली होती. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे मस्त मस्त पतंग त्यांनी आणले आणि मग गच्चीवर जाऊन मनसोक्त उडवले. त्या दिवशी जेवण- खाणं, चहा-पाणी सगळं गच्चीतच! इशिकाने बडोद्यात पतंग उडवण्याचा खेळ खूपच एन्जॉय केला. पण घरी परत येताना मात्र तिला पतंगाबद्दल पुष्कळ प्रश्न पडले होते. म्हणजे पहिला पतंग कुठे तयार झाला असेल? गुजरातमध्ये पतंगांना इतकं महत्त्व का आहे? आपण आत्ता उडवतो तसेच पतंग पूर्वीसुद्धा होते की त्यांच्यात काही बदल झालाय? असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले. घरी पोचल्यावर त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचीच असं तिने ठरवलं. तिची आई मूळची बडोद्याची असल्यामुळे तिने आईला त्याबद्दल विचारलं. आई म्हणाली की, ‘‘देवांना झोपेतून उठवण्यासाठी पतंग उडवण्याची प्रथा पडली असं मानलं जातं. आधी राजे- महाराजांनी या प्रथेची सुरुवात केली. मग नवाबांनीसुद्धा तीच परंपरा राखली. या खेळाची सुरुवात झाली ती राजेशाही खेळ म्हणून, पण नंतर मात्र सर्वसामान्य माणसंही पतंगाच्या खेळात भाग घ्यायला लागली. फक्त गुजरात मध्येच नाही तर दिल्ली, पंजाब, बिहार अशा अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने पतंग उडवले जातात.’’
पण मग अहमदाबादमध्ये होतो तो ‘इंटरनॅशनल काइट फेस्टिव्हल’ कधीपासून सुरू झाला? इशिकाने विचारलं.
‘‘त्याची सुरुवात साधारण १९८९ मध्ये झाली. जगभरातून अनेक लोक पहिल्या ‘इंटरनॅशनल काइट फेस्टिव्हल’मध्ये भाग घ्यायला आले होते. अजूनही यू. के., अमेरिका, जपान, इंडोनेशिया, इटली, कॅनडा, ब्राझील अशा कितीतरी देशांमधले लोक पतंग उडवायला- पतंग बघायला येतात.’’ आईचं उत्तर ऐकून इशिका आणखी काही विचारणार तेवढय़ात तिच्या आजोबांनी तिला त्यांच्याकडची एक- दोन पुस्तकं दिली. त्यात पतंगांबद्दल बरीच माहिती होती. पतंगांची रंगीत चित्रं आणि फोटो होते. ते बघून इशिका एकदम खूश झाली. दिवसभर बसून तिने ती पुस्तकं वाचली. आजीने सांगितलेल्या काही वेबसाइट्स बघितल्या आणि त्यातून तिला अनेक आश्चर्यकारक गोष्टी कळल्या.
संध्याकाळी आई-बाबा, आजी-आजोबा सगळ्यांसमोर इशिकाने एक छोटंसं भाषणच केलं. त्यात ती म्हणाली की, ‘‘पतंग मूळचा भारतातला नाहीच, तो आहे चायना मधला! पाचव्या शतकात बी.सी.मध्ये पतंगाचा शोध लागला. तेव्हा अंतर मोजण्यासाठी, संदेश देण्यासाठी, संवादासाठी पतंग वापरला जायचा. चायनामधला पतंग नंतर भारत, जपान, कंबोडिया, कोरिया आणि अन्य देशांमध्येही माहीत झाला. युरोप मध्ये मात्र पतंग तसा उशिराच पोचला. आधी १३ व्या शतकात मार्को पोलोने पतंगाबद्दल तिकडे सांगितलं होतं, पण खराखुरा पतंग तिथे पोचला १६-१७व्या शतकामध्ये.
चीन, जपान, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, युरोप, अमेरिका, ब्राझील, कोलंबिया अशा अनेक देशांमध्ये आता पतंग उडवला जातो; आणि गंमत म्हणजे व्हिएतनाममध्ये पतंगाला शेपटी नसते! त्याऐवजी पतंगाला एक शिट्टी लावतात. त्यामुळे पतंग उडताना वाऱ्यामुळे शिट्टी वाजते!’’
इशिकाच्या या माहितीमध्ये तिच्या बाबाने आणखी थोडी भर घालत म्हटलं, ‘‘१७५० मध्ये बेंजामिन फँकलिन यांनी एका प्रयोगासाठी प्रपोजल दिलं होतं. ‘Lighting is caused by electricity’ हे सिद्ध करणाऱ्या प्रयोगासाठी त्यांनी पतंगाचा वापर करायचं ठरवलं होतं. राईट बंधूंना विमान तयार करतानाही पतंगाचा उपयोग झाला होता.’’
इशिका आणि तिच्या बाबाकडून ही माहिती ऐकल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता पुढच्या वर्षी सक्रांतीला इशिका पतंग उडवणार आहे. पण पतंगाच्या खेळात पशू-पक्ष्यांना, माणसांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी ती घेणार आहे. पतंगाची माहिती शोधायला इशिकाला खूप मज्जा आली. तुम्हीही आणखी माहिती नक्की शोधा!
 – anjalicoolkarni@gmail.com

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
man arrested from gujrat after 12 years in wife assulting case
पत्नीला मारहाण प्रकरणात अटक टाळण्यासाठी १२ वर्षे पसार; गुजरातमध्ये नाव बदलून वास्तव्य करणाऱ्या एकास अटक
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया