साहित्य– सोनेरी जाड कागद, हिरवा जाड कागद,  टिकल्या, शोभेचं साहित्य, कात्री, गम, फुलाच्या आकाराचे पंच मशीन, इ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृती- हिरव्या जाड कागदाच्या आयताकृती पट्टय़ा कापा. साधारण १ इंच उंच व ४ -५ इंच लांब अशा आकाराच्या ५ पट्टय़ा तयार करा. सर्व पट्टय़ांना कात्रीने जवळ जवळ खाचा करा.  खालच्या बाजूस बोटभर जागा सोडा. रिकाम्या जागेवर गम लावा व गुंडाळी करून दूर्वाची जुडी तयार करा. सोनेरी जाड कागदाचा बाप्पाच्या डोक्याच्या मापाने चौकोन कापा व पुन्हा साधारण १ इंचाची पट्टी कापून मधोमध जोडा. हिरव्या रंगाच्या कागदाची त्यापेक्षा छोटय़ा आकाराची पट्टी कापून त्यावर फुलाच्या पंच मशीनने फुले पाडा. ही पट्टी सोनेरी मुकुटाच्या पट्टीवर जोडा. चित्रात दाखविल्याप्रमाणे टिकल्या व इतर शोभेच्या साहित्याने सुशोभन करा. अशा पद्धतीने तुम्ही कंठीसुद्धा बनवू शकता. बाप्पासाठी रोज नवनवे दागिने बनवू शकता.

अर्चना जोशी – muktakalanubhuti@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paper crafts for kids