साहित्य– जुने सुशोभनाचे कागद (वापरलेलेही चालतील), जुने वर्तमानपत्र, कात्री, गम.
कृती- जुने वापरलेले सुशोभनाचे कागद (चकचकीत, गुळगुळीत नको) घ्या. त्याच्या आयताकृती जाडसर पट्टय़ा कापून घ्या व साधारण ४ x १२ चे आडवे तुकडे करा. प्रत्येक तुकडा आडवा दुमडा. दुमडीवर जोर न देता थोडय़ा थोडय़ा अंतरावर अलगद खाचे द्या. खाचांमध्ये सुमारे पाव इंचाचे अंतर ठेवा. उलटय़ा बाजूस उघडा व दोन्हीकडच्या आडव्या कडा एकमेकांना गम लावून जोडा (न कापलेली बाजू) जुन्या वर्तमानपत्राच्या घट्ट गुंडाळ्या करून घ्या. देठासाठी घट्ट गुंडाळी आवश्यक आहे. या गुंडाळीवर आपण अर्धवट कापून जोडलेली पट्टी बाहेरील बाजूवर गम लावून गुंडाळीवर हलक्या हाताने गोलाकारात गुंडाळत जा. झटपट फूल तयार होईल. दुसरे टोक गुंडाळीस पक्के चिकटवा. अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगीत कागदांची फुले तुमच्या टेबलाची शोभा नक्कीच वाढवतील.
अर्चना जोशी – muktakalanubhuti@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2016 रोजी प्रकाशित
आर्ट कॉर्नर : झटपट फुले
दुमडीवर जोर न देता थोडय़ा थोडय़ा अंतरावर अलगद खाचे द्या. खाचांमध्ये सुमारे पाव इंचाचे अंतर ठेवा.
Written by अर्चना जोशी

First published on: 07-08-2016 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The art corner