17 December 2018

News Flash

दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१७

‘जुने ते सोने’ या म्हणीची आठवण ठेवा.

daily horoscope

मेष ‘जुने ते सोने’ या म्हणीची आठवण ठेवा. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांची ये-जा थोडीशी मंदावल्यामुळे पशाची तात्पुरती तंगी भासेल.  तुमच्या गरजा भागतील इतके पसे तुम्हाला सहज मिळतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या गरजेनुसार तुम्ही काम तयार करून ठेवाल. बेकार व्यक्तींनी येणाऱ्या संधीचा ताबडतोब फायदा उठवावा. घरामध्ये जे काम कराल त्यामध्ये आपली खासीयत दिसली पाहिजे, असा तुमचा आग्रह असेल.

वृषभ हत्तीला जेव्हा पकडायचे असते तेव्हा एका खड्डय़ावर गवत रचून ठेवले जाते. त्या गवताच्या मोहाने हत्ती येतो आणि खड्डय़ात पडतो. तशी तुमची स्थिती होण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात बाहेरून पाहणाऱ्याला तुमचे काम चांगले वाटेल, पण पसे जास्त न मिळाल्यामुळे तुम्ही मात्र फारसे खूश नसाल. जोडधंद्याची थोडीफार साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एकामागून एक कामे तुम्हाला सांगत जातील. तुमच्या हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्या. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे मूड सांभाळावे लागतील.

मिथुन तुमच्या स्वभावातले दोन वेगवेगळे कंगोरे या आठवडय़ात दिसून येतील. करिअर किंवा व्यवसायात तुम्ही खूप आधुनिक असाल, पण व्यक्तिगत जीवनात मात्र चाकोरीबद्ध मार्गाचा अवलंब कराल. हे तुमचे वागणे इतरांना कोडय़ात टाकणारे असेल,  व्यापार-उद्योगात तुमची कल्पनाशक्ती पणाला लावून एखादे काम मार्गी लावाल. नोकरीमध्ये आवडते काम ताबडतोब पूर्ण कराल आणि इतर कामे सोयीस्कररीत्या विसरून जाल. घरामध्ये मुलांचे उपद्व्याप त्रासदायक ठरतील.

कर्क भरपूर काम करणारी तुमची रास आहे. जेव्हा तुमच्याकडे काम नसते त्या वेळेला तुम्ही अस्वस्थ आणि अशांत बनता. या आठवडय़ात तुमची परिस्थिती अशीच असेल. व्यापार-उद्योगात वेळेअभावी जी कामे तुम्ही लांबवलेली होती त्या कामात आता लक्ष घालाल. पशाची आवक समाधानकारक असेल. नोकरीमध्ये कामाचा वेग हळूहळू वाढेल. वरिष्ठांना मात्र एखादे काम तुम्ही तातडीने करावे असे वाटेल. घरामध्ये एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल.

सिंह तुमची दोन वेगवेगळी रूपे या आठवडय़ात दिसून येतील. तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप गंभीरपणे विचार कराल. व्यापार-उद्योगातील पशाचा जास्त विचार न करता एखाद्या सामूहिक कामात आपुलकीने सामील व्हाल. नवीन प्रोजेक्टचा विचार मनात येईल. नोकरीमध्ये स्वत:चे काम वेळेत आणि चांगल्या पद्धतीने पार पाडाल.  घरामध्ये लहान मुलांचे जास्त वर्चस्व असेल. त्यांचे हट्ट तुम्हाला पुरवावे लागतील.

कन्या ग्रहमान तुमच्या बुद्धीला चालना देणारे आहे. ज्या कामाला काही केल्या गती येत नव्हती ते काम तुम्ही युक्तीच्या जोरावर मार्गी लावाल. व्यापार-उद्योगात एखादी अवघड वसुली करण्यासाठी मध्यस्थांचा वापर कराल. नोकरीमध्ये तुमचा लहरी आणि मूडी स्वभाव दिसून येईल. पण संस्थेच्या कामाला तुमची गरज असल्यामुळे तुमची बडदास्त ठेवली जाईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये सगळ्यांची हौस-मौज पूर्ण कराल. पण त्यांनी हट्ट केला तर तुम्हाला राग येईल. नको त्या कारणाकरता पसे खर्च करू नका.

तूळ सभोवतालच्या व्यक्तींचा मूड कसाही असो, तुम्ही मात्र या आठवडय़ात मौजमजा करण्याच्या मूडमध्ये असाल. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तींशी ओळखी होतील. त्यांच्याकडून काही नवीन कल्पना कळतील, पण त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या किचकट कामातून तुम्ही स्वत:ची सुटका करून घ्याल. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांना चांगले ग्रहमान आहे. घरात तुम्ही तुमच्या लहरीनुसार वागाल.

वृश्चिक ग्रहमान तुम्हाला भूलभुलया निर्माण करणारे आहे. ज्या गोष्टींना विशेष महत्त्व नाही त्यामध्ये तुम्ही बराच वेळ घालवाल. याउलट आवश्यक असणाऱ्या कामामध्ये कळत-नकळत तुमचे दुर्लक्ष होईल. व्यवसाय-उद्योगात ज्या ठिकाणाहून पसे अपेक्षित होते तिथून ते न मिळाल्यामुळे बरीच धावपळ उडेल. नशिबापेक्षा तुम्हाला तुमचे कष्टच उपयोगी पडतील. नोकरीच्या ठिकाणी सगळी कामे एकटय़ाने करत बसू नका. घरामध्ये कामाचा ताण वाढल्यामुळे तुमच्या हातून छोटी-मोठी चूक होईल.

धनू शक्ती आणि युक्ती यांचा योग्य समन्वय झाला की अवघड कामातही यश मिळते याचा प्रत्यय देणारे हे ग्रहमान आहे. जे तुम्ही मनाशी ठरवाल ते तुम्ही प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवाल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामाची वसुली झाल्यामुळे तुम्ही खूश असाल. नोकरीच्या ठिकाणी ज्या सवलती इतरांना मिळत नाहीत, त्या तुम्हाला दिल्या जातील. त्याच्या बदल्यात अवघड काम  सोपवले जाईल. घरामध्ये मौजमजेचा माहोल असेल.

मकर आता अनेक महत्त्वाचे ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. त्यामुळे तुमची स्थिती सोन्याहून पिवळी अशी होणार आहे. जरी काही प्रश्न आले तरी त्यावर तुम्ही तातडीने मार्ग शोधून काढाल. व्यापार-उद्योगात पशाचा ओघ चालू राहिल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद असेल. नोकरीच्या ठिकाणी विशेष सवलती मिळाल्यामुळे तुमच्या हालचालीमध्ये एक प्रकारचा रुबाब दिसेल. ज्यांना बदली किंवा नोकरीत बदल हवे असेल त्यांनी प्रयत्न सुरू करावे.  घरामध्ये आवडत्या नातेवाईकांची किंवा मित्रमंडळींची हजेरी लागेल.

कुंभ रवी, बुध, गुरू, शुक्र आणि शनी हे पाच ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. त्यामुळे जी गोष्ट मनाशी ठरवाल ती पूर्ण करून दाखवाल. त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. व्यापार-उद्योगात जे काम तुम्ही पूर्वी केलेले आहे त्यातून नवीन काम मिळेल. आíथक परिस्थिती सुधारल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीमध्ये संस्थेकडून विशेष सवलत मिळाल्याने तुमचा जीव धन्य होईल. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. आवडत्या मित्रमत्रिणींसमवेत छोटासा मेळावा ठरेल.

मीन गेल्या काही आठवडय़ांमध्ये तुम्ही खूप काम केले असेल त्याची दमणूक आता तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी होईल. ज्यांनी पसे द्यायचे कबूल केले होते ते आपला शब्द लांबवतील. नोकरीच्या ठिकाणी जे काम पूर्वी लांबविलेले होते ते पूर्ण करणे भाग पडेल. तुमच्या कामामध्ये शिथिलता येईल. घरामध्ये सगळ्यांच्या अपेक्षा असतील, पण तुम्हाला मात्र कामाचा कंटाळा येईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on October 27, 2017 1:01 am

Web Title: astrology 27th october to 2nd november 2017