21 February 2019

News Flash

दि. ९ ते १५ फेब्रुवारी २०१८

थोडेसे यश मिळाले की माणसाची हाव वाढत जाते आणि त्यातून नंतर फसगत होते.

मेष थोडेसे यश मिळाले की माणसाची हाव वाढत जाते आणि त्यातून नंतर फसगत होते. यापासून सावध राहा. व्यापार-उद्योगात जास्त पसे मिळविण्याकरिता अयोग्य व्यक्तींशी संगत करू नका. नोकरीच्या ठिकाणी अधिकारांचा गरवापर करण्याचा मोह होईल. एखाद्या निमित्ताने खरे हितचिंतक आणि दिखाऊ मित्र यातला फरक कळेल. घरामध्ये संपूर्ण आठवडा महत्त्वाची कामे हाताळायला चांगला आहे. त्याचा ताबडतोब फायदा उठवा.

वृषभ परिस्थिती कशीही असो प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पाहण्याचा अधिकार असतो. त्यानुसार तुम्हाला या आठवडय़ात भव्य-दिव्य काम करावेसे वाटेल. व्यापार-उद्योगातील एखाद्या अवघड प्रश्नावर तोडगा निघेल. प्रतिष्ठित व्यक्तीकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवावीशी वाटेल. घरामध्ये जोडीदाराच्या प्रगतीविषयी किंवा स्वास्थ्याविषयी चिंता वाटेल

मिथुन ग्रहमान हळूहळू सुधारलेले आहे. त्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढू लागतील. व्यापार-उद्योगात ज्यांनी पूर्वी तुम्हाला मदत करायचे ठरविलेले होते, त्यांच्याकडून तुम्हाला सहकार्य मिळायला सुरुवात होईल. पशासंबंधी निर्णय घेताना तुमची मर्यादा तुम्ही ओलांडू नका. नोकरीमध्ये पूर्वी जी संधी गमावली होती ती पुन्हा एकदा नजरेच्या टप्प्यात येईल. घरामध्ये एखाद्या सदस्याविषयी चिंता निर्माण झाली असेल तर त्यावर उपाय मिळेल.

कर्क सभोवतालची परिस्थिती अनुकूल असेल. प्रत्येक गोष्ट मिळवताना प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. व्यापार-उद्योगात पशाची तंगी जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी एक काम संपले की वरिष्ठ दुसरे काम तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधणे कठीण होईल. स्वत:कडे दुर्लक्ष करावे लागेल. तुमच्या लाघवी स्वभावामुळे एखादा वाद आटोक्यात येईल. बऱ्याच दिवसानंतर लांबच्या नातेवाईकांना भेटण्याचा योग संभवतो.

सिंह ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. जे काम तुम्हाला अगदी सोपे वाटले होते, त्यामध्ये गुंतागुंत होईल. ही गुंतागुंत सोडविण्याकरिता तुमचा बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांच्या गरजेकडे लक्ष ठेवून कामाचे नियोजन कराल. नोकरीच्या ठिकाणी सत्तेपुढे शहाणपण नसते हे लक्षात ठेवा. वरिष्ठांनी सांगितलेले काम बिनचूक करण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये चिडचिड होईल. तब्येतीकडे लक्ष ठेवा.

कन्या ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. त्यामुळे तुमची मन:स्थिती उत्साहवर्धक असेल. हातात घेतलेले काम बुद्धीच्या जोरावर तुम्ही पूर्ण करून दाखवाल. व्यापार-उद्योगात एखाद्या मोठय़ा व्यक्तीशी ओळख झाल्यामुळे तुमचे अवघड काम सोपे होईल. सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहार यांना गती मिळेल. नोकरीमध्ये इतरांनी जे काम अर्धवट सोडले होते ते काम वरिष्ठ तुम्हाला पूर्ण करायला सांगतील.

तूळ काम कोणतेही असो ते पूर्ण करण्याची जिद्द तुमच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे या आठवडय़ात तुमचा कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. व्यापार-उद्योगात प्रयत्न करूनही ज्या कामांना मुहूर्त लागत नव्हता ती कामे मार्गी लागतील. पशाची आवक चांगली असल्यामुळे व्यापार-उद्योगात तुमचा मूड चांगला राहील. नोकरीमध्ये अवघड काम मार्गी लागल्यामुळे तुम्ही  नििश्चत व्हाल.

वृश्चिक तुमची इच्छा असो वा नसो या आठवडय़ात तुम्हाला घरगुती कामात लक्ष घालावे लागेल. त्यामुळे करिअरकडे दुर्लक्ष होईल. व्यापार-उद्योगाच्या कामात गिऱ्हाईकांची ये-जा कमी असल्याने तुमच्या डोक्यात नवीन कल्पना िपगा घालू लागतील. धनलाभाचे योग सप्ताहाच्या सुरुवातीला संभवतात. नोकरीच्या ठिकाणी कामाचा  कंटाळा येईल. घरामध्ये पाहुण्यांची अचानक हजेरी लागल्यामुळे ठरलेले कार्यक्रम बदलावे लागतील.

धनू जी माणसे तुमच्या अवतीभोवती आहेत त्यांच्याशी तुम्ही युक्तीने वागलात तर या आठवडय़ात बरीच कामे होतील. व्यापार-उद्योगात एखादे काम तांत्रिक कारणाने अडून राहिले असेल तर त्या कामात गती येईल. अपेक्षित पसे आठवडय़ाच्या मध्यात हातात पडतील. नोकरीच्या ठिकाणी तुमची बेधडक काम करण्याची वृत्ती थोडीशी नियंत्रणात ठेवा. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्ती तुमच्या उदारपणाचा थोडासा गरफायदा घेतील.

मकर पशावर प्रेम करणारी तुमची रास आहे. ज्या ठिकाणी पसे असतील त्या ठिकाणी तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करता. या स्वभावाची चुणूक सभोवतालच्या व्यक्तींना दिसून येईल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाच्या सुरुवातीला जे काम होईल ते तुमच्या फायद्याचे असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश करणाऱ्या कामाला तुम्ही जास्त प्राधान्य द्याल. घरामध्ये नवीन जागा किंवा वाहन खरेदीसह गुंतवणूक होईल.

कुंभ सर्व ग्रहमान तुम्हाला चांगले असल्यामुळे तुमच्यामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होईल. व्यापार-उद्योगात सरकारी कामे किंवा कोर्ट व्यवहार काही कारणाने लांबला असेल तर त्याला वेग येईल. नोकरीच्या ठिकाणी कोणतेही काम बाकी ठेवायचे नाही हा तुमचा इरादा पूर्ण होऊ शकेल. नेहमीपेक्षा जास्त काम तुमच्या हातून होईल. घरामध्ये ज्यांनी तुमच्यावर काही कारणाने टीका केली होती त्यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल.

मीन ग्रहमान थोडेसे फसवे आहे. एखाद्या कामात आपला फायदा होईल असे तुम्हाला वाटेल, पण थोडेसे काम केल्यानंतर लक्षात येईल की हे मृगजळ आहे. व्यापार-उद्योगात पशाची गुंतवणूक केल्यास त्यातून लवकर फायदा मिळणार नाही. सप्ताहाच्या मध्यात अपेक्षित पसे हाती येतील. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांना मदत करा, पण तुमच्या कामातील लक्ष विचलित होऊ देऊ नका.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 9, 2018 1:01 am

Web Title: astrology 9th to 15th february 2018