01vijay1मेष काही प्रश्न पुन्हा डोके वर काढतील, या वेळी तुम्ही त्यांना धाडसाने सामोरे जाल. व्यापार-उद्योगात तुमची कल्पकता आणि कृतिशीलता दोन्ही उपयोगी पडेल. कामाच्या निमित्ताने एखाद्या नवीन व्यक्तींशी बोलून तुम्हाला बरे वाटेल. इतरांना न जमलेले काम तुम्ही नोकरीच्या ठिकाणी कराल. तुम्हाला पटलेली एखादी गोष्ट तुम्ही घरच्यांना समजावून सांगाल. एखाद्या सभारंभात तुमचा पुढाकार महत्त्वाचा असेल.

वृषभ व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात धनप्राप्तीने झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा उत्साह येईल. मोठय़ा व्यक्तींशी गाठीभेठी ठरवून अर्धवट राहिलेली कामे आटोक्यात आणाल. नोकरीमध्ये तुमचा व्यक्तिगत फायदा वाढणारे एखादे काम हातात येईल, त्याचा तुम्ही फडशा पाडाल. सप्ताहाच्या मध्यात तातडीच्या कामानिमित्त अचानक प्रवासाला जावे लागण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुमचा सल्ला आणि दूरदृष्टी याचा इतरांना उपयोग होईल. छोटासा मेळावा ठरण्याची शक्यता आहे.

मिथुन नवीन कल्पना तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, पण त्याचा भविष्यामध्ये उपयोग होणार का याचा विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय निश्चित करू नका. व्यवसाय-उद्योगात तुमचे अंदाज-आडाखे बरोबर ठरल्यामुळे काही कामे मार्गी लागतील. जुनी गिऱ्हाईके परत येण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना एखादी चांगली कल्पना सुचल्यामुळे वरिष्ठ काहीतरी आश्वासन देतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीचे विचार सगळ्यांना उपयोगी पडतील.

कर्क एकंदरीत तुम्हाला हवे तसे ग्रहमान असल्यामुळे तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी वाटेल, पण काळजी करु नये. सर्व गोष्टी तुमच्या नियोजनानुसार पार पडतील. नोकरीमध्ये ज्या कामाविषयी तुमच्या मनामध्ये भीती होती ते काम व्यवस्थित पार पडेल. याची वरिष्ठ स्तुती करतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. त्यानिमित्ताने तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क साधाल.

सिंह माघार न घेता काम करण्याच्या प्रयत्नांमुळे उद्दिष्ट पूर्ण होईल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाच्या सुरुवातीला हातात पसे असल्यामुळे काही तातडीची देणी पूर्ण होतील. सप्ताहाच्या शेवटी एखादे अवघड काम तुम्ही पार पाडाल. नोकरीमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा असणाऱ्या कामावर लक्ष केंद्रित करा. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष कराल. ते वरिष्ठांना कळू देणार नाही. घरगुती सभारंभामध्ये खर्च बजेटबाहेर जातील.

कन्या जी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्हाला तुमचे धोरण ठरवावे लागेल. व्यापार-उद्योगात  गरजेइतके पसे मिळतील. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याचे धाडस करू नका. स्पर्धकांच्या हालचालीकडे लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी संस्थेमध्ये काय चालले आहे याची खबरबात ठेवा, पण त्याचा तुमच्या कामावरती परिणाम होऊ देऊ नका. एखादे नवीन काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये जोडीदार तुमची अडचण समजून घेईल. त्यामुळे मनावरचा ताणतणाव कमी होईल.

तूळ ‘नशीब महत्त्वाचे का प्रयत्न?’ हा प्रश्न तुम्हाला पडेल. या आठवडय़ात तुम्हाला स्वत:च्या प्रयत्नांवरच विश्वास ठेवावा लागेल. मनात आलेल्या व्यापार-उद्योगाच्या  अनेक नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज भासेल. कारखानदारांना आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करावा लागेल. नोकरीत वाढीव कामं तुम्हाला करावी लागतील. नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष होईल. घरातील व्यक्तींना तुम्ही वेळ देऊ शकणार नाही.

वृश्चिक सर्व ग्रहमान तुम्हाला अनुकूल आहे. त्याचा कसा फायदा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचे आहे. व्यापारउद्योगात अपेक्षित पसे मिळणार नाहीत. तुम्ही न डगमगता त्यावर पर्याय शोधून काढाल. जोडधंदा असणाऱ्यांना पूर्वी केलेले प्रयत्न उपयोगी पडतील. नोकरीत तुमचे काम तुम्ही उत्तमप्रकारे पार पाडाल. ज्यांनी पूर्वी तुम्हाला मदत केली नव्हती ते आता मदत करतील. घरामध्ये एखाद्या कारणाने प्रिय व्यक्तींचा मेळावा ठरण्याची शक्यता आहे. नवीन वातावरणामुळे तुमच्यात चतन्य निर्माण होईल.

धनू ग्रहमान थोडेसे कष्टदायक पण यश देणारे आहे. कोणतेही काम हातात घेताना त्यातील यशाविषयी तुम्हाला भीती असेल, पण नंतर सर्व काही ठीक होईल. व्यापार-उद्योगातील महत्त्वाच्या गाठीभेटींना प्राधान्य द्या. अनेक कामे मार्गी लागतील. अपेक्षित पसे हाती पडल्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह संचारेल. घरामध्ये तुमचा सल्ला आणि सक्रिय मदत याचा सगळ्यांना आधार वाटेल. एखादे शुभकार्य ठरेल.

मकर तुमचा मूड काम करण्याचा असेल, पण सभोवतालच्या व्यक्तींना तुम्ही मौजमजा करायला हवे असाल. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता काही योजना आखून ठेवल्या असतील त्या कार्यान्वित करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीमध्ये प्रत्यक्ष काम कमी, पण कामाचा दिखावा जास्त असेल. तुम्ही सुचविलेली एखादी कल्पना वरिष्ठांना आवडेल. किचकट काम पूर्ण करण्याकरिता तुम्ही सहकाऱ्यांना मदत कराल. त्यानिमित्त पाहुण्यांच्या येण्याची नांदी होईल. तुम्ही मात्र बजेटचा विचार करत बसाल.

कुंभ शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याच्या तुमच्या गुणाचा या आठवडय़ात उपयोग होईल. व्यापार-उद्योगात एखादा नवीन प्रयोग करावासा वाटेल. आधुनिक तंत्रज्ञान मिळविण्याकरिता कारखानदार परदेशवारी करतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची चुणूक दाखवाल. अवघड प्रश्नावर तोडगा शोधून काढाल. काही जणांना छोटी परदेशवारी करता येईल. घरामध्ये इतरांच्या कामामध्ये तुम्ही आपुलकीने लक्ष घालाल. प्रवासाचे बेत ठरण्याची शक्यता आहे.

मीन तुमच्या एखाद्या स्वप्नाला आता सुयोग्य वातावरण मिळेल. व्यापार-उद्योगात तुमची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. एखादा भव्यदिव्य प्रोजेक्ट हातात घ्यावासा वाटेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना गिऱ्हाईकांना खूश ठेवून चांगले पसे कमावता येतील. चांगले काम करण्याकरिता वरिष्ठ प्रोत्साहन देतील. घरामध्ये सजावट करायचे ठरवाल. एखादे लांबलेले कार्य निश्चित होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com