सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे मनमोकळ्या स्वभावाला आनंदी वृत्तीची साथ लाभेल. गरजूंना मार्गदर्शन कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारीवर्ग उत्तम साथ देईल. जोडीदारासह वेळीच संयम राखा. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. अपचन व उष्णतेचे त्रास सतावतील.

वृषभ बुध-नेपच्यूनच्या नवपंचमयोगामुळे बौद्धिक व मानसिक शक्ती वाढेल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. सहकारीवर्गाला मदत कराल. जोडीदारासह काही मुद्दय़ांवर असलेले मतभेद बाजूला ठेवून एकंदरीत एकमेकांचा सहवास आनंददायी असेल. उत्सर्जन संस्था व पाठ यांचे आरोग्य सांभाळा.

मिथुन चंद्र-मंगळाच्या समसप्तमयोगामुळे तापटपणा वाढेल. हाती घेतलेल्या कामात अडचणी येतील. मात करण्यासाठी शांतपणे विचार करणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात सहकारीवर्गाची मदत पुरी पडणार नाही. जोडीदाराची परिस्थिती बिकट असेल. आपला आधार त्याला दिलासा देईल. त्वचाविकार सतावतील.

कर्क रवी-बुधाच्या युतीयोगामुळे नव्या संधी उपलब्ध होतील. बौद्धिक छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात आíथक बाजू सांभाळावी लागेल. वरिष्ठ व सहकारीवर्ग यांच्यात ताळमेळ घालून द्यावा लागेल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात अधिकच व्यस्त असेल. मित्रमंडळींच्या सहवासात तणाव कमी होईल.

सिंह बुध-प्लुटोच्या लाभयोगामुळे बौद्धिक क्षेत्रात प्रगती कराल. नवे तंत्रज्ञान आत्मसात कराल. नोकरी-व्यवसायात योग्य निर्णय घेऊन पुढचे पाऊल उचलाल. जोडीदारासह सूर जुळतील. एकत्रितपणे कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची सेवा कराल. नातेवाईकांना मदत कराल. हाडे व सांधे यांचे विकार बळावतील.

कन्या शनी-बुधाच्या लाभयोगामुळे व्यावहारिक बुद्धीचा वापर करून प्रसंग निभावून न्याल. बुधाच्या अवखळ स्वभावाला शनीचा लगाम बसेल. नोकरी-व्यवसायात समयसूचकता उपयोगी पडेल. सहकारीवर्गाला मदत कराल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. रक्तदाब संतुलित ठेवा.

तूळ चंद्र-बुधाच्या समसप्तमयोगामुळे व्यवहारकुशलता दाखवाल. बुद्धी व मनाचा समतोल साधाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळवाल. सहकारीवर्ग नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करेल. जोडीदारासह शब्द जपून वापरा. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. दंड भरून येणे, खांदा आखडणे असे त्रास संभवतात.

वृश्चिक शुक्र-नेपच्यूनच्या नवपंचमयोगामुळे मत्रीच्या नात्यातील भावनांना विशेष महत्त्व द्याल. अतिसंवेदनशील न होता कर्तव्यदक्ष बनाल. नोकरी-व्यवसायात कल्पक विचार मांडाल. कामानिमित्त प्रवास कराल. जोडीदाराची आवडनिवड जपाल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची मर्जी राखाल. ओटीपोट व उत्सर्जन संस्थेचे आरोग्य जपा.

धनू मंगळ व गुरू या दोन बलवान पुरुष ग्रहांच्या लाभयोगामुळे नेहमी प्रयत्नशील राहाल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश मिळण्यासाठी विशेष मेहनत घ्याल. सहकारीवर्ग आपल्या सूचनांचे पालन करेल. जोडीदाराची विचारधारा वेगळी असली तरी ऐकून व समजून घ्याल. इन्फेक्शनपासून त्वचेला जपा.

मकर चंद्र-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे आवडत्या छंदासाठी वेळ राखून ठेवाल. नजीकच्या भविष्यातील योजना आखण्यात मन रमेल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखणे अवघड जाईल. नव्या गोष्टी शिकायला मिळतील. जोडीदारासह प्रवासयोग संभवतो. कौटुंबिक समस्या दोघे मिळून सोडवाल. भावनेत गुरफटून न जाता व्यावहारिक दृष्टीने योग्य निर्णय घ्याल.

कुंभ रवी व शनी या दोन विरुद्ध तत्त्वांच्या ग्रहांच्या लाभयोगामुळे समोरून आलेली संधी थोडक्यात हुकेल. लढा देण्याची शक्ती वाढेल. नोकरी-व्यवसायात सहकारीवर्गाच्या अडचणी समजून घ्याल. गरजूंसाठी योग्य व्यक्तींकडे शब्द टाकाल. जोडीदाराची प्रगतीच्या वाटेवरील आगेकूच आपणासही प्रेरणादायी ठरेल. पित्त व कफ डोकं वर काढतील. वेळेवर घरगुती उपचार केल्यास आटोक्यात राहतील.

मीन चंद्र-शुक्राच्या नवपंचमयोगामुळे कलेचा आस्वाद घ्याल. कटकटींपासून दूर राहाल. आहे त्यात समाधान मानाल. नोकरी-व्यवसायात कामातील दिरंगाई टाळाल. वरिष्ठांचे मत स्वीकारून त्याची अंमलबजावणी कराल. सहकारीवर्गाला योग्य मार्गदर्शन कराल. आíथक गणिते सोडवाल. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. मणक्याला योग्य व्यायाम व आराम आवश्यक आहे.