‘ब्लॉग बेंचर्स’चा ताजा विषय : ‘उद्यमारंभ आणि आरंभशून्यता’

‘नवउद्यम’ म्हणजेच ‘स्टार्ट अप’ कंपन्यांना अवास्तव महत्त्व नको अशी स्पष्ट व परखड मांडणी करणाऱ्या ‘उद्यमारंभ आणि आरंभशून्यता’ या ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉगबेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

नवउद्यमांकरिता केंद्रारने जाहीर केलेल्या योजनेची १८ जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या या अग्रलेखात चिकित्सा करण्यात आली. या योजनेनुसार नवउद्यम कंपन्यांकरिता स्वतंत्र निधी राखून ठेवला जाणार आहे. तसेच, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध नियमांमधूनही सूट देण्याचे सरकारचे धोरण आहे. परंतु, नवउद्यम हे मूलभूत उद्योगांना पर्याय ठरू शकत नाहीत. केंद्राच्या या योजनेचा व एकूणच सर्वत्र नवउद्यम कंपन्यांच्या झालेल्या बोलबाल्याचा अत्यंत स्पष्ट व वास्तववादी दृष्टिकोनातून आढावा घेणाऱ्या या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडायची आहे. तत्पूर्वी याच विषयावर ‘डायमेन्शन्स एनएक्सजी’चे संस्थापक अभिजीत पाटील आणि ‘कोकुयो कॅॅम्लिन लिमिटेड’चे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष दिलीप दांडेकर या दोन उद्योजकांनाही ‘लोकसत्ता’ने बोलते केले आहे. नवउद्यम आणि मूलभूत अशा दोन्ही उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या उद्योजकांची भूमिका विद्यार्थ्यांना आपल्या विचारांची मांडणी करण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल.

लक्षात ठेवावे असे..

  • या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे आहे.
  • मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ.
  • indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
  • ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.
  • नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते.
  • ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
  • किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पध्रेसाठी विचार केला जाईल.
  • सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.