खुलेपणाने मांडा तुमची मते
विद्यार्थ्यांवर समाज माध्यमांचाच नव्हे तर अनेक वृत्त व माहिती वाहिन्यांवरूनही माहितीचा मारा होत असतो. त्यामुळे ही पिढी खरे तर ‘बघती’ अधिक आहे. त्यांना ‘लिहिती’ करण्यास या उपक्रमामुळे मदत होणार आहे. तसेच, दृश्यांचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवरच होतो की मेंदूमध्ये त्यावरून प्रक्रियाही सुरू होते हे ‘ब्लॉगबेन्चर्स’ या उपक्रमातून समजणार आहे. मुले लिहातातही फार त्रोटक. आपले मत मांडणारी पाच वाक्ये लिहायला सांगितली तरी घालमेल होते. त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करून मत मांडण्याची संधी देणारे हे व्यासपीठ आहे. त्यामुळे शिस्तबद्धपणे मत मांडण्याची सवय त्यांना लागले. लिखाणाचे संस्कार होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मनातील उलथापालथ या निमित्ताने वाचायला मिळणार आहे. शहरी भागातील मुलांपेक्षाही या उपक्रमाला ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक प्रतिसाद देतील. कारण, शहरापेक्षाही विद्यार्थ्यांची सर्जनशीलता ग्रामीण भागात अधिक अनुभवयाला मिळते.

स्पध्रेत सहभागी होण्यासाठी..
’स्पध्रेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
www. loksatta.com /blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पध्रेत सहभागी होऊ शकतात.
’ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
’यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
’‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.
अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’