प्रयोगशील शिक्षण म्हणजे काय, गणित सोप्या पद्धतीने शिकता येणारे अ‍ॅप, ई-लर्निगचा अवलंब केलेल्या शाळा.. अशी शिक्षणविश्वातील प्रयोगांची सफर घडवणाऱ्या ‘शिक्षण वारी’ला चार दिवसांत राज्यातील पाच हजारांहून अधिक शिक्षकांनी भेट दिली. शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाऊंडेशनने आयोजित केलेले हे प्रदर्शन रविवारी (३१ जानेवारी) सर्वाना पाहण्यासाठी खुले आहे.
शिक्षण विभागाने राज्यातील उपक्रमशील शिक्षक तसेच काही संस्थांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे ‘शिक्षण वारी’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
मंगळवारपासून (२७ जानेवारी) सुरू झालेल्या या प्रदर्शनाला गेल्या चार दिवसांत राज्यातील पाच हजारांहून अधिक शिक्षक, अधिकारी यांनी भेट दिली. चार दिवस शिक्षकांसाठी असलेले हे प्रदर्शन रविवारी सर्वाना पाहण्यासाठी खुले आहे.
बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पाहता येणार आहे. ‘शिक्षण वारी’मध्ये शिक्षणातील प्रयोगांची, उपक्रमांची आणि विविध प्रवाहांची ओळख करून देणारे ५४ हून अधिक गाळे आहेत.
कुमठे भागात राबवण्यात आलेला ज्ञानरचनावादाचा प्रयोग, लोकसहभागातून शाळेचा विकास करणारे धुळे जिल्ह्य़ातील शिक्षकांचे काम, ई-लìनग, कृतियुक्त अध्यापन, क्रीडा, व्यवसाय शिक्षण, गुणवत्ता वाढ, संगीत, कला-कार्यानुभवाचे शिक्षण, व्यवसाय समुपदेशन, मूल्यवर्धन, स्वच्छता समावेशित शिक्षण, भाषा अध्यापन, शिक्षक सहयोगी दल, पर्यावरणपूरक शिक्षण आदी विषयांची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक तसेच शिक्षण क्षेत्रात विविध पातळ्यांवर कार्यरत असणाऱ्या अशासकीय संस्था यात सहभागी आहेत.
श्यामची आई फाऊंडेशन, भारतीय स्त्री शक्ती पुनरुत्थान, समरसता गुरुकुलम, विद्याभारतीची शिशुवाटिका, लेंड-अ-हँड इंडिया आदी संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत.

‘हुतात्मा’ मारुती कांबळे या अग्रलेखावर व्यक्त व्हा..
* हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’त २५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘हुतात्मा’ मारुती कांबळे या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ.
indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सहभागी होता येते.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पध्रेसाठी विचार केला जाईल.