एके काळी काळाच्या पुढे असणारे प्रवासात एका जागी थांबले की कसे मागे पडतात आणि इतरांनाही कसे मागे ओढतात याचे ‘मूर्ति’मंत उदाहरण म्हणजे नारायण मूर्ती. इन्फोसिस या त्यांनी स्थापित केलेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी मूर्ती यांच्या निवृत्त्योत्तर लुडबुडीस कंटाळून अखेर राजीनामा दिला. कंपनीने नवीन क्षेत्रे पादाक्रांत करावीत, यासाठी प्रयत्नशील असतानाच सिक्का यांना जाणे भाग पाडल्याने होणारे नुकसान एकटय़ा इन्फोसिसचे नाही, ते भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे आहे. पिढीच्या संघर्षांत पुढच्याऐवजी मागच्या पिढीचीच सरशी होत असेल तर ते या क्षेत्राला मागे नेणारे आहे. सिक्का यांच्या जाण्यामुळे इन्फोसिसचीच कोंडी होणार असून तिला ना कोणी प्रयोगशील प्रमुख भेटेल ना आता कंपनी बदलण्याचा प्रयत्न होईल. हे दुर्दैवी आहे. याची पुनरावृत्ती रोखायची असेल तर प्रत्येक क्षेत्रातील ढुढ्ढाचार्याचे वारंवार मूर्तिभंजन व्हायला हवे. मूर्तिपूजेतून स्थितिवादीच तयार होतात. प्रगतीसाठी मूर्तिभंजनास पर्याय नाही, असे मत ‘ ‘मूर्ति’पूजा आणि ‘मूर्ति’भंजन’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.  हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या  indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘ ‘मूर्ति’पूजा आणि ‘मूर्ति’भंजन’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे.  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी  loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

मराठीतील सर्व लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share your opinion on loksatta blog benchers
First published on: 25-08-2017 at 01:17 IST