शाळकरी वयातच हवामान बदलाच्या प्रश्नासाठी सर्वस्व पणाला लावणारी ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण- तरुणींची आदर्श आहे. २०१८ मध्ये स्वीडनच्या संसदेच्या बाहेर हवामान बदलाच्या प्रश्नासाठी ‘स्कूल स्ट्राइक’ करत असल्याचा फलक घेऊन बसणारी, या प्रश्नावर काहीही करत नसल्याबद्दल जागतिक पातळीवरच्या नेत्यांना धारदार प्रश्न विचारत जगाचं लक्ष वेधून घेणारी ग्रेटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती स्वीडिश सरकारने तिच्या सन्मानार्थ पोस्टाचा स्पॅम्प प्रसिद्ध केल्यामुळे. स्वीडन सरकारने ‘व्हॅल्यूएबल नेचर’ अर्थात ‘मौल्यवान निसर्ग’ या विषयावर पाच स्पॅम्पची एक मालिका केली असून त्यात ग्रेटालाही स्थान देण्यात आलं आहे. स्वीडनमधल्या निसर्गाच्या जतनीकरणात असलेल्या ग्रेटाच्या योगदानाचा स्वीडन सरकारने अशा पद्धतीने सन्मान केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पॅम्पच्या एका चित्रात १८ वर्षाची ग्रेटा एका उंच कड्यावर उभी आहे असं दाखवलं आहे. तिच्या अंगात ग्रेटाचा ट्रेडमार्क ठरलेला पिवळा रेनकोट आहे. तिची वेणी वाऱ्यामुळे उजव्या बाजूला उडते आहे. स्वीडनमधले चित्रकार हेन्निंग ट्रोलबॅक यांनी ही पाचही चित्रं काढली आहेत. या स्टॅम्पची किंमत १२ क्रोनॉर (स्वीडिश चलन) म्हणजेच १.४ डॉलर आहे. १४ जानेवारीपासून हे स्टॅम्प विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greta thunberg features on swedens postage stamp joins zlatan ibrahimovic and greta garbo sas
First published on: 15-01-2021 at 15:30 IST