कौस्तुभ केळकर नगरवाला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेकी कर और दर्या मे डाल…
आजची ताजी ताजी गोष्ट.
अगदी पंधरा मनटांपूर्वीची.
रोजच्यासारखं मी भिडे पूलावरनं चाललोय.
नारायणातून खाली ऊतरायचं.
भिडे पूलावरनं, पुलाखालच्या रस्त्यानं,
मौजे कोथरूडला जायचं, ही मौज औरच.
ट्रॅफीकलेस जॉयफूल गंमत.
दोन दिवस झालेत.
पुलापलिकडे गवतावरच,
सध्या दोन चार फ्यामिलीजनं डेरा टाकलाय.
फुगे विकणारी मंडळी आहेत.
दहा बारा पुरूष, तेवढ्याच बायका.
पंधरावीस पोरं.
कसे काय राहतात कुणास ठाऊक..?
मी नारायणातून खाली ऊतरलो.
और पिक्चर चालू हो गया.
एकदम वास्तव.
नो साऊंड.
माझ्यापुढे एक रिक्शा.
पलिकडच्या बाजूनं एक छोटसं पोर.
तीनेक वर्षाचं.
कसं कुणास ठाऊक ?
पुलाच्या कठड्याच्या रेलींगपाशी पोचलेलं.
त्याची आई त्याच्यापलीकडे पन्नास फुटांवर.
तिचं लक्षच नाहीये…
ती आपले फुगे फुगवत बसलीये.
ते पोरगं एकेक पाऊल पुढे.
पुलाच्या जवळ जवळ मध्यभागी.
खाली वाहतं पाणी.
ते खाली वाकून बघतंय.
रेलींगमधे भरपूर अंतर…
ते पोरगं सहज सटकून जाईल एवढं…
मी बघतोय…
जाम टरकलोय.
जीव खावून गाडी पळवतोय.
तरीही अजून बराच लांब आहे…
हेल्पलेस.
ते पोरगं कुठल्याही क्षणी खाली पाण्यात…
मला माझी लेक आठवली.
सर्कन काटा आला.
पलक झपकनेसे पेहले…
माझ्यापुढची रिक्षा त्या पोरापर्यंत पोचलीये…
कट टू कट…
एक लॅपटॉप सांभाळणारा चेक्सवाला हात बाहेर येतो.
त्या खाली पडणाऱ्या पोराला अलगद ऊचलतो.
पोराला रिक्शा पोटात घेते.
हुश्श…
माझ्या पोटाला न भरता येणारा खड्डा पडलेला.
एवढं परफेक्ट टायमिंग विराटला सुद्धा जमायचं नाही.
रिक्षा तशीच सुसाट.
पलीकडच्या बाजूला पोराची आई आपल्याच नादात…
तो चेक्सवाला हात पुन्हा बाहेर येतो.
पोराला अलगद त्याच्या आईकडे सोपवतो.
रिक्षा तशीच बुंगाट पुढे…
ते पोरगं चेक्सवाल्याकडे बघून हसलं असावं बहुतेक.
दॅटस् आॅल.
मॉरल आॅफ दी स्टोरी…
नेकी कर,  दरिया में डाल.
त्या चेक्सच्या जागी मी असतो तर…
पोराला नक्की ऊचललं असतं…
नंतर त्याच्या आईजवळ पोचवताना…
दोन शब्द सुनवले असते.
हजार वेळा मागं बघितलं असतं…
माझं परफेक्ट टायमिंग.
कौतुकाचे चार शब्द…
लोकांच्या ऊदो ऊदो नजरा.
काहीही सोडलं नसतं…
तो चेक्सचा हात वेगळाच होता…
आपलं काम केलं अन् निघून गेला.
या हाताचं त्या हाताला कळू न देता.
तो रिक्षाचा सारथी तर साक्षात भगवान श्रीकृष्णच.
कोण होता कुणास ठाऊक ?
मनापासून हात जोडले…
अन् पुढे पळालो.
आजची मॉर्नींग हळूच कानात सांगून गेली.
आजच्या दिवसात एखादं चांगल काम कर…
और भूल जा…
टिमकी नै बजाने का.
ऊसीमें च जिंदगी का असली मजा है !
गुड्डे एव्हरीबडी…

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He saved the life of little boy blog by kaustubh kelkar
First published on: 10-12-2019 at 13:53 IST