मनोज वैद्य

काळानुरुप सारेच बदलले आहे. तंत्रज्ञान क्रांतीचा विस्फोट झाला आहे. नवीन तंत्रयुगाचा सा-याच प्राणीमात्रावर परिणाम झाला आहे. नवीन युगातील टोपीवाला आता मोबाईलधारी झाला आहे, तो टोपीसोबतच मोबाईल कव्हर , गॉगल्स, इ. विकतो आहे. आता त्याचा आजोबा ज्या रस्त्यावरून टोप्या विकायला जात होता त्या रस्त्यावरील जंगल नष्ट झाले आहे. पूर्वी आजोबाच्या टोपीची ऐतिहासिक गोष्ट जिथे घडली होती, त्या परिसरात मंदिर बांधले गेले आहे. त्यात बरेच देव आहेत. त्यामध्ये हनुमानाचे मंदिरसुध्दा आहे, त्या परिसरातील माकडे आणि जंगल नष्ट झाली तरी आपले अस्तित्व टिकवून आहेत. ते आता फळांऐवजी मानवी अन्नपदार्थावर जगायला शिकलेत.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!

आताचा टोपीवाला मंदिराच्या परिसरात विश्रांती करतो. मोबाईलवरुन तो सोशल मिडीयावरसुध्दा असतो , तर टोपीवाला थोडीशी डुलकी घेतो. माकडे हळूच त्याची बॅग उघडतात आणि त्यातून टोप्या, गॉगल्स व गळ्यात अडकवायचे मोबाईल कव्हर सराईतपणे पळवतात. थोड्याफार उशिराने तो उठतो. त्याच्या लक्षात येते आजोबाने जी चूक केली होती ती आपणसुध्दा केली आहे.

वाचा: टोपीवाला,माकडे आणि भारतीय मतदार या ब्लॉगचा पूर्वार्ध

तो मागील गोष्टीला अनुसरुन देवळाच्या छपरावरील माकडांकडे बघतो. सगळी माकडे डोक्यावर टोपी, डोळ्यांवर गॉगल व गळ्यात मोबाईलचे रिकामे कव्हर घालून त्याच्याकडे बघत असतात.

तो आजोबाप्रमाणे डोक्यावरची टोपी काढून खाली टाकतो. पण माकडे माञ दात काढून खी-खी आवाज काढतात, जणूकाही त्याला सुचवतात की आम्हाला काय मागच्या पिढीप्रमाणे मुर्ख समजलास काय?
आता माञ टोपीवाला चक्रावतो, त्याच्या लक्षात येते की जुनी युक्ती वापरुन काही मिळणार नाही. नवीन तंत्रयुगाचे काहीतरी वापरुन आपला माल हस्तगत करावा लागेल.

तो मोबाईलचा स्पीकर चालू करतो आणि त्यावर लूंगी डान्स ! लूंगी डान्स!! गाणे लावतो. टोपीवाला डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल व गळ्यांत रिकामे मोबाईलचे कव्हर घालतो, आणि मंदिराच्या तुळशी वृंदावनभोवती गोलाकार त्या गाण्याच्या तालावर नाचायला सुरुवात करतो , सगळी माकडे बघत असतात.

टोपीवाला नाचता-नाचता टोपी, गॉगल व मोबाईल कव्हर काढून तुळशी वृदांवनावर ठेवतो आणि गाणे तसेच चालू ठेवून लांब बसून राहतो. तोपर्यंत माकडे रंगात आलेली असतात. तेसुध्दा टोपीवाल्याप्रमाणे नाचता-नाचता सगळ्या वस्तू काढून ठेवतात. अचानक टोपीवाला गाणे थांबवून बंदुकीच्या गोळीबाराची रिंगटोन वाजवतो. माकडे घाबरुन पसार होतात आणि टोपीवाला आपला माल गोळा करुन पुढच्या प्रवासाला निघतो.

काळानुरुप इथे सामाजिक व राजकिय आसमंतातसुध्दा देशात बदल झालेत. मतदार जेवढे हुशार झालेत, राजकारणीसुध्दा तितकेच भामटे झाले आहेत. सोशल मिडीयावरुन खोट्या पोस्ट वेगाने व्हायरल होत असतात, विरोधक तितक्याच वेगाने दूसरी अफवा पसरवत असतात.

अशा वातावरणात २०१४ मधील निवडणुकीत सोशल मिडीयावरुन भाजपच्या आयटी सेलने काँग्रेसवर जोरदार आक्रमण केले. सत्ताधारी काँग्रेसला त्याची ताकद लक्षात यायच्या आधीच सारे संपले होते.

“अच्छे दिन ” या घोषणेची टोपी मतदारांनी डोक्यात फिट्ट घालून घेतली होती. काला धन वापस आयेगा या आशेचे गॉगल डोळ्यावर घालून दूरवर नजर लावून होता. सबका साथ सबका विकासचे गाणे लावून तो चेकाळत मोदी-मोदीचे नारे देत तो बेधुंद होऊन नाचत होता.

अशातच जोरदार आवाज झाले, नोटबंदीचा एक बार उडाला होता. मतदार गांगरले होते. तेवढ्यातच जीएसटीचा दूसरा मोठ्या आवाजाचा बार उडाला होता. यामधून मतदार मात्र सावरला नाही. त्याने काढता पाय घेत मोदींपासून धूम ठोकल्याचे लक्षात आले.

पोटनिवडणुकीतील पराभवातून ते लक्षात आले होते. पण तीन राज्यात मजबूत जनाधार असलेल्या भाजपने सत्ता गमावली होती. मेरा बूथ सबसे मजबूत, पन्ना प्रमुख , संघाचे नियोजन हे सारेच निवडणूकीत वापरले जाणारे तंञ निरुपयोगी ठरले होते.

टोपीवाल्याने आता झोपेचे सोंग घेऊन सतत माकडांच्या डोक्यात टोपी घालण्याचे सुरु केले आहे. वृत्तवाहिन्यांवर खोट्या बातम्या राञंदिवस सुरु आहेत. सोशल मीडिया व वृत्तपत्रे अपवाद वगळता सरकारी झाली आहे.
राममंदिराचा मुद्दा वापरुन सत्तेवर येण्यासाठी दिलेली आश्वासने मतदारांच्या मनातून विस्मृतीत जातील यासाठी प्रयत्न केले जात आहेत.तर “राफेल ” प्रकरणात चौकीदारही चोर है, या काँग्रेसच्या घोषणेने भाजप हैराण आहे. त्यावर उपाय म्हणून भाजपने सर्व धर्मिय खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण जाहीर केले.

मतदारांची मानसिकता अनुकूल करण्यासाठी चिञपटसृष्टीचा वापर केला जात आहे. टॉयलेट एक प्रेमकथा यासारखे सरकारी कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित करणारे सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

पण आता तर गांधी-नेहरु घराण्याला खलनायक ठरवण्याकरिता सरदार पटेलांचा जगातील उंच पुतळा उभारण्यात आला. परंतु यासारखे खर्चिक प्रकल्प सातत्याने राबवणे शक्य नाही. याकरीता आता मनमोहन सिंग यांना गांधी घराण्याने त्रास दिला होता, हे दाखवणारा चिञपट ” द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ” या नावाने काढण्यांत आला.येणाऱ्या निवडणुकीत मतदारांच्या मेंदूवर विविध प्रचारी प्रयोगाने आक्रमण होत आहे.
यात कमी म्हणून शिवसेनेने ऐन निवडणूकीचे टायमिंग साधत शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावर सिनेमा प्रदर्शित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शिवसेनेचा काठावर असलेला मतदार पुन्हा मागे वळेल असे प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून होत आहे.

पण मतदाराने माञ आपले डोके कुणाकडून वापरले जाणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. प्रत्येक पक्षांकडून घडवून आणलेल्या घटनांकडे तटस्थपणे पाहीले पाहीजे. याकरीता मतदारांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे…

होय,
तुमची खानदानी प्रवचनं
छानच आहेत
तुमचे रेशीमकाठी वादविवाद
तेही श्रवणीय मननीय
आणि माननीयही आहेत
तुमच्या पायापाशी बसून
मी सारं ऐकेन
खुप काही शिकेनही
पण तूर्त माझ्या सन्मिञांनो,
रजा द्या मला
पलिकडच्या जंगलामध्ये
हिमलाटेत कुडकुडणा-या
त्या नागड्या पोरांकडे
मला जायचं आहे
त्यांच्या अंगणात
जाळ पेटविण्यासाठी…

एकूणच सध्याच्या निवडणुकीच्या मोसमात आपल्यावर घोषणांचा -आश्वासनांचा व योजनांचा पाऊस पडणार आहे. पण हे सारे तात्पुरते आहे. आपले प्रश्न राजकारणी कधीच निकाली काढणार नाहीत. आपल्या समस्या संपल्या की आपण त्यांना इतर प्रश्न विचारु शकतो याची त्यांना खाञी आहे.त्यामुळे तेच समस्या निर्माण करुन त्या सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे सोंग करत असतात.

सरतेशेवटी मतदारांच्या उत्कृष्ट निर्णय क्षमतेचे एक उदाहरण आहे. दुस-या महायुध्दाचा महानायक विन्स्टन चर्चिल याने हिटलरविरोधी युध्द जिंकून फक्त ब्रिटनलाच नव्हे तर जगाला वाचविले.पण त्या विजयाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणूकीत चर्चिलला पराभव स्विकारावा लागला होता. त्यावर तेथिल मतदारांनी प्रतिक्रिया दिली होती की, चर्चिलचे नेतृत्व देशाला युध्द जिंकण्यासाठी योग्य होते, परंतु युध्दोत्तर देशाची उभारणी करण्यासाठी चर्चिलचे नेतृत्व योग्य ठरले नसते !

त्यामुळे निवडणुकीत आश्वासनाची टोपी मतदारांनी मुळीच घालून घेऊ नये, राजकारणी टोपीवाल्यांपासून दूरच रहावे. विवेकी,तटस्थ व स्वाभिमानी मतदार होण्याचा जिद्दीने प्रयत्न करा माकडांप्रमाणे टोपीवाल्याचे अनुकरण करु नका.
अन्यथा आपण देशाचे भविष्य अंधकारमय करण्यासाठी जबाबदार असणार आहोत.

(उत्तरार्ध)
manojvvaidya@gmail.com