मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईकरानी दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला आहे  यामध्ये  स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे ,  सभागृह नेत्या तुष्णा विश्वासराव , विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, माजी आमदार मंगेश सांगळे, सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी  कामिनी शेवाळे, भाजप आमदार आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला.

शिवसेनेच्या नगरसेविका व सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव या वॉर्ड क्रमांक 179 मधून पराभूत झाल्या आहेत. त्यांचा काँग्रेसच्या नियाज वानू यांनी पराभव केला. विश्वासराव या शिवसेनेतून तीनवेळा निवडून आल्या होत्या. दोनवेळा त्यांनी सभागृहनेते पद भूषवले होते.  स्थायी समिती अध्यक्ष  य़शोधर फणसे हे वॉर्ड क्रमांक 60 मधून पराभूत झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार योगीराज दाभाडकर हे विजयी झाले आहेत. फणसे हे   तीनवेळा  नगरसेवक, दोनवेळा सभागृहनेते व स्थायी समिती अध्यक्ष ही पदे भूषवली होती. तसेच काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्सना दिघे यांचाही पराभव झाला आहे. वॉर्ड क्रमांक  132 मधून पालिकेचे विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांना जोरदार धक्का बसला आहे.भाजपचे अब्जादीश उमेदवार व प्रथमच निवडणूक लढवणा-या पराग शहा यांनी छेडा यांचा पराभव केला आहे. छे़डा हे सुरुवातीला भाजपमध्ये व त्यानंतर काँग्रेस असे तीन टर्म निवडून आले होते. काँग्रेसमधील गटाच्या राजकारणात संजय निरुपम यांनी देवेंद्र आंबेरकर यांना विरोधी पक्ष पदावरून हटवून समर्थक असलेल्या छेडा यांची वर्णी लावली होती. वर्षभरापूर्वी ते विरोधी नेते पदावर विराजमान झाले होते. छेडा यांना हरवण्यासाठी पराग शहा सारख्या तगड्या व गुजराती उमेदवाराला उभे केले. अखेर येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या गुजराती मतदारांनी छेडा यांना नाकारून शहा यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. छेडा यांच्या पराभवाने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.  काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेच्या तिकीटावर वॉर्ड क्रमांक 68 मधून निवडणूक लढवणारे पालिकेचे माजी विरोधी विरोधीपक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनाहि पराभवाला सामोरे जावे लागले. जपचे उमेदवार रोहन राठोड यांनी त्यांचा पराभव केला. आंबेरकर हे तीनवेऴा निवडून आले आहेत.

भाजपचे मुंबई अध्यक्ष व प्रचारात  शिवसेनेवर टीकेची झोड उठवणारे आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना वॉर्ड क्रमांक 51 मधून  शिवसेनेच्या स्वप्नील टेंबवलकर यांनी पराभव केला. शेलार यांची दुसरी टर्म होती. त्यांनी शिक्षण अध्यक्ष पद भूषवले होते. शिवसेनेने शेलारांना घऱचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेस मधून एमएमआय मध्ये प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नगरसेविका  वकारुन्नीसा अन्सारी यांचा असून  काँग्रेस च्या निकीता निकम विजयी झाल्या आहेत.