लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित भ्रष्ट राजकारणाच्या विरोधात आघाडी उघडून सत्ता परिवर्तन घडवून आणणाऱ्या भाजप शिवसेनेतच आता त्याच मुद्दय़ावरून संघर्ष पेटला आहे. त्यामुळे पालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार हाच मुद्दा निर्णायक ठरेल.

मुंबईसह दहा महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यांतील ११ जिल्हा परिषदांसाठी उद्या मंगळवारी मतदान होत आहे. मुंबईत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांतच खरी लढत आहे. केंद्रात दहा वर्षे आणि राज्यात पंधरा वर्षे सत्ता असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची राजवट उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर भाजपने व राज्य स्तरावर भाजपसोबत शिवसेनेने भ्रष्टाचार या मुद्दय़ाचाच आधार घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना एकत्र लढले होते. त्या वेळी राज्यातील सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचार, आदर्श घोटाळा या प्रकरणावरून रान उठवून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात जनमत तयार करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटली, तरी दोन्ही पक्षांनी स्वंतत्रपणे भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरच काँग्रेस आघाडीला लक्ष्य केले होते. त्याचाही परिणाम झाला. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. केंद्राच्या व राज्याच्या सत्तेत हे भाजप व शिवसेना हे दोन पक्ष एकत्र आले.

Arvinder Singh Lovely
राजीनामा दिल्यानंतर दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, “पक्षातील काही समस्या…”
Delhi Congress president resigns Arvinder Singh Lovely is upset with the candidates
दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा; उमेदवारांवरून अरविंदरसिंग लवली नाराज
Amravati, Vanchit Bahujan Aghadi,
अमरावतीत ‘वंचित’मध्‍ये फूट; जिल्‍हाध्‍यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
bhiwandi east mla rais shaikh resigns
समाजवादी पक्षात भिवंडीवरून धुसफुस; रईस शेख यांचा पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा

मुंबईसह दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने भाजप व शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मुंबई महापालिकेतील जागावाटप हे युती तुटण्यामागचे सुरुवातीला कारण सांगितले जात असले, तरी पुढे दोन्ही पक्षांच्या प्रचारात भ्रष्टाचार हाच प्रमुख मुद्दा राहिला. मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप करीत भाजपने सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर सेनेने नागपूर पालिकेतील जुने घोटाळ्याचे प्रकरण उकरून भाजपवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला.

भ्रष्टाचारमुक्तीचे शिवसेनेला वावडे -भांडारी

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलेले भाजप व शिवसेना एकमेकांच्या विरोधातच भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत, याकडे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांचे लक्ष वेधले असता, काँग्रेस आता रिंगणाबाहेर आहे, त्यामुळे २५ वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कारभारावर टीका होणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले. खरे म्हणजे शिवसेनेला सांभाळून घेण्यासाठी मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभार आणण्याचा मुद्दा भाजपने पुढे केला, परंतु पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त महापालिका या शब्दांचे शिवसेनेला वावडे आहे, असे सांगून भाजपने शिवसेनेविरुद्ध उघडलेल्या आघाडीचे त्यांनी समर्थन केले.

राज्य सरकारचा कारभार असमाधानकारक -गोऱ्हे

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करणाऱ्या भाजपप्रणित राज्य सरकारचा कारभारही समाधानकारक नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. सिंचन, आदर्श घोटाळ्याविरोधात आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी लढलो, परंतु पुढे भाजपच्या नेत्यांनी त्यातून अंग का काढून घेतले, असा सवाल त्यांनी केला. कुपोषण, महागाई, या प्रश्नांवर सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना सरकारकडून समाधानकारक उत्तर दिले जात नाहीत, असेही त्या म्हणाल्या.लोकसभा निवडणुकीपासून ते महापालिका निवडणुकीपर्यंत भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेनेने घेतलेली भूमिका सुसंगतच आहे, असा दावा त्यांनी केला.