नवी दिल्ली :

२०२०-२१ या पुरवठा वर्षांत नोव्हेंबपर्यंत इथेनॉलचा पुरवठा हा ३०२ कोटी लिटरहून अधिक होणे अपेक्षित असून तो २०१३-१४ मध्ये केवळ ३८ कोटी लिटर होता, असे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.

water problems in Mira Bhayander area
मिरा-भाईंदरमध्ये भीषण पाणीटंचाई; दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, नागरिकांचे हाल
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
diy quick tips to save energy at home 3 tricks to reduce your electricity bill and save energy know how
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल येईल २०-३० टक्क्यांनी कमी! वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स; एसी वापरानंतरही ‘नो टेन्शन’

२०२०-२१ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरले जाण्याचे प्रमाण हे ८.१ टक्के आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्याच्या योजनेबाबत अहवालात म्हटले आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्याचे प्रमाण हे २०२५ पर्यंत २० टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. हे प्रमाण १० टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य २०२२ दरम्यान गाठले जाईल, असेही अहवालात नमूद केले आहे.

हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सरकारने विविध पिकांचे अवशेष, मळी, उसाचा रस आणि पाक, साखर आणि खराब झालेल्या तसेच अतिरिक्त तांदूळ, मका आदी धान्यापासून ( जे भारतीय अन्न महामंडळाकडे आहे ) इथेनॉलनिर्मितीस परवानगी दिली आहे. साखर कारखान्यांच्या आसवनी किंवा स्वतंत्र आसवन्यांना त्यासाठी परवानगी दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, ईबीपी कार्यक्रमांतर्गत २०१३-१४ या पुरवठा वर्षांमध्ये इथेनॉलचा पुरवठा हा ३८ कोटी लिटर होता. तो २०१९-२० मध्ये १७३.३ कोटी लिटपर्यंत वाढला आहे.