हिंडेनबर्ग अहवाल समोर आल्यानंतर अदाणी समूहाच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. त्यावर मात करण्यासाठी अदाणी ग्रुप अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी अदाणी समूहाने आता गुजरातमधील मुद्रा येथील ३४,९०० कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे काम स्थगित केले आहे. गौतम अदाणी यांच्या नेतृत्वाखालील अदाणी समूह आता कामकाज सुरळीत करण्यावर आणि गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांची चिंता दूर करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

अदाणी समूहाकडून गुंतवणूकदार आणि बँकांच्या चिंता दूर करण्यासाठी निर्णय

अदाणी समूहाची कंपनी अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) तिच्या मुंद्रा पेट्रोकेम लिमिटेडच्या सहकार्याने २०२१ मध्ये गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अदाणी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) च्या जमिनीवर ग्रीनफिल्ड कोळसा ते PVC प्लांट उभारणार आहे. तो बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. परंतु हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी २०२३ रोजी जारी केलेल्या आपल्या अहवालात अदाणी समूहावरील अकाऊंटिंग फ्रॉड, स्टॉक मॅनिप्युलेशन यासह कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील अनियमिततेच्या आरोपांनंतर गौतम अदानींना आतापर्यंत सुमारे १४० अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूह गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि बँकांच्या चिंता दूर करण्यासाठी विविध धोरणे अवलंबत आहे.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

अदाणी समूहाने हिंडेनबर्ग अहवालातील आरोप फेटाळून लावले

अदाणी समूहाने यापूर्वीच हिंडेनबर्गने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रक्रियेअंतर्गत रोख प्रवाह आणि उपलब्ध आर्थिक स्थिती यांचे पुनर्मूल्यांकनदेखील केले जात आहे. ज्या प्रकल्पावर अदाणी समूहाने काही काळ पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे, तो दरवर्षी १ दशलक्ष टन क्षमतेचा ग्रीन पीव्हीसी निर्मितीचा प्रकल्प आहे. एका मेलद्वारे अदाणी समूहाने सर्व विक्रेते आणि पुरवठादारांना त्याच्याशी संबंधित सर्व काम त्वरित निलंबित करण्यास सांगितले आहे.