पीटीआय, नवी दिल्ली

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) विद्यमान आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत एक्स्चेंज ट्रेडेड फंडामध्ये (ईटीएफ) १३,०१७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी गुरुवारी संसदेत दिली.

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ईटीएफमध्ये ५३,०८१ कोटी रुपये,२०२१-२२ मध्ये ४३,५६८ कोटी रुपये आणि २०२०-२१ मध्ये ३२,०७१ कोटी रुपये गुंतवले आहेत. तसेच २०१९-२० या वर्षात ईटीएफमध्ये ३१,५०१ कोटी रुपये आणि २०१८-१९ मध्ये २७,९७४ कोटी रुपये गुंतवले, असेही तेली यांनी सांगितले. सरकारने निश्चित केलेल्या गुंतवणूक पद्धतीनुसार ईपीएफओ निधीची गुंतवणूक करते. भांडवली बाजारातील कोणत्याही ब्लू-चिप कंपनीसह एखाद्या कंपनीच्या समभागामध्ये थेट गुंतवणूक करत नाही. केवळ ईटीएफच्या माध्यमातून भांडवली बाजारात गुंतवणूक केली जाते.

आणखी वाचा-कर्जाचा मुदत काळ न वाढवण्याचे बँकांना फर्मान

३१ मार्च २०२२ पर्यंत ईपीएफओद्वारे व्यवस्थापित केलेल्या विविध फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता १८.३० लाख कोटी रुपये आहे. ज्यामध्ये रोखेसंलग्न योजनांमध्ये ९१.३० टक्के गुंतवणूक केली तर एकूण निधीपैकी केवळ ८.७ टक्के गुंतवणूक ईटीएफमध्ये करण्यात आली आहे.