PIB Fact Check : गेल्या काही दिवसांपूर्वीच २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्यात आल्यात, तसेच त्या जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतही देण्यात आलीय. परंतु २००० रुपयांच्या नोटेनंतर आता ५०० रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. २००० च्या नोटा बंद झाल्यामुळे बनावट नोटा बाजारात धुमाकूळ घालत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोठा धोका समोर आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ५०० रुपयांच्या नोटांबाबत अनेक प्रकारचे बनावट मेसेजही व्हायरल होत आहेत. अलीकडेच RBI गव्हर्नरच्या स्वाक्षरीचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याचे सत्य पीआयबी फॅक्ट चेकरने सांगितले आहे.

तुम्हीही ५०० रुपयांची नोट न घेण्याबाबत ऐकले असेल किंवा वाचले असेल, तर सावधान व्हा. कारण पीआयबी फॅक्ट चेकमध्ये ही गोष्ट पूर्णपणे खोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या मेसेजकडे लक्ष देणे टाळावे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया…

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

हेही वाचाः Money Mantra: ‘या’ सरकारी योजनेत २५ लाखांच्या ठेवींवर ११ लाखांपेक्षा जास्त व्याज मिळणार अन् FD पेक्षा जास्त परतावा

हा मेसेज व्हायरल होत आहे

५०० रुपयांची नोट घेऊ नका, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या फोटोजवळ आहे, असे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये म्हटले आहे. हा मेसेज व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने हा मेसेज फॅक्ट चेक केलाय. या मेसेजचे सत्य काय आहे ते जाणून घेतले आहे.

हेही वाचाः एका बँकेकडून ग्राहकांना दिलासा अन् दुसऱ्या बँकेने EMIचा भार वाढवला; ‘या’ दोन बँकांनी बदलला MCLR दर

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये सत्य आले समोर

जेव्हा PIB Fact Checkने या मेसेजची सत्यता समजली, तेव्हा धक्कादायक बाब उघडकीस आली. पीआयबी फॅक्ट चेकने हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले. आरबीआय आणि पीआयबीने स्पष्टपणे म्हटले आहे की, असे अजिबात नाही. दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत. अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि गोंधळात पडू नका, असे आवाहन पीआयबीने केले आहे.