लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: आघाडीचा डिजिटल सराफा मंच असलेल्या ऑगमाँटने मंगळवारी लॅब-ग्रोन डायमंड अर्थात प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी देशातील पहिलावहिले व्यासपीठ उपलब्ध केले. देशभरातील सुमारे ५,००० हून अधिक सराफांना सेवा देणाऱ्या या ऑनलाइन स्पॉट ट्रेडिंग मंचावर आता लॅब-ग्रोन डायमंड्सचा समावेश करण्यात आला आहे.

सोने खरेदी-विक्रीसाठी ऑगमाँट हे देशातील सर्वोत्तम डिजिटल मंच आहे. वेगाने वाढणाऱ्या या उद्योगातील मागणीचा आढावा घेत ऑगमाँटने आता लॅब-ग्रोन डायमंड (एलजीडी) व्यवहार मंच उपलब्ध केला आहे. हा मंच अमेरिका, युरोप, आखाती देश आणि पूर्व आशियासह जागतिक स्तरावर हिऱ्यांचे बाजार मूल्य आणि वितरण सक्षम करण्यास मदत करेल, असे ऑगमाँट समूहाचे संचालक केतन कोठारी म्हणाले. ऑगमाँट एलजीडी किंमतीसाठी एक मानदंड निश्चित करण्याची योजना आखत आहे, असे लॅब-ग्रोन डायमंडचे (एलजीडी) उत्पादन प्रमुख आरव बाफना म्हणाले,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एलजीडी’ म्हणजे काय?

प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हिऱ्यांना लॅब-ग्रोन डायमंड (एलजीडी) म्हटले जाते. उत्खननातून मिळणाऱ्या नैसर्गिक हिऱ्यांप्रमाणेच बावनकशी असलेल्या या हिऱ्यांची प्रयोगशाळेत नियंत्रित प्रक्रियेचा वापर करून निर्मिती केली जाते.