सिटी ग्रुप येत्या दोन वर्षांत २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. चौथ्या तिमाहीत १.८ अब्ज डॉलरचा तोटा झाल्याची माहिती दिल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सध्या जगभरात २,३९,००० कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या १८०००० पर्यंत कमी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, असंही मुख्य वित्तीय अधिकारी मार्क मेसन यांनी सांगितले. अशा कपातीतून जाणे कोणत्याही कंपनीसाठी कठीण आहे. कर्मचारी कपातीमुळे महसूल वाढीस अडथळा येणार नाही, असंही त्यांनी अधोरेखित केले.

सीएनबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, सिटीग्रुपचे सीईओ जेन फ्रेझर यांनी २०२४ हे वर्ष यूएस बँकिंग समूहासाठी “टर्निंग पॉइंट” असल्याचे वर्णन केले आहे. मेक्सिकन कार्यालय वगळता सिटीग्रुपमध्ये २०२३च्या अखेरीस अंदाजे दोन दशलक्ष कर्मचारी होते. चौथ्या तिमाहीत बँकेचे पुनर्गठन, रशियामधील व्यवसाय बंद आणि अर्जेंटिनातील एकूण ३.८ अब्ज डॉलरचे नुकसान यामुळे बँकेला १.८ अब्ज डॉलरचा तोटा झाला.

हेही वाचाः RBI ची ३ बँकांवर मोठी कारवाई; २.४९ कोटींचा ठोठावला दंड, ‘या’ बँकांमध्ये तुमचे खाते नाही ना

“चौथ्या तिमाहीत बँकेची कामगिरी अत्यंत निराशाजनक असताना आम्ही चांगली सुलभ करण्यासाठी रणनीती आखली आणि २०२३ साठी आमची रणनीती फायदेशीर ठरली,” असंही फ्रेझर म्हणाले. फ्रेझर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संपत्तीनुसार यूएसमधील तिसर्‍या क्रमांकाच्या बँकेत व्यापक फेरबदलाची घोषणा केली होती. यंदा सिटीग्रुपला विच्छेदन आणि पुनर्रचना खर्चासाठी एक अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचाः व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये २६.३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, ३ दिवसांत ४० हजारांहून अधिक करार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिटीग्रुपचे सीईओ म्हणाले, “आम्ही आमच्या सुगम आणि वर्गीकरण मार्गावर किती मागे आहोत हे पाहिल्यास नक्कीत २०२४ हा एक टर्निंग पॉइंट ठरेल. कंपनीने यापूर्वी बँकेच्या उच्च स्तरापासून सुरुवात केल्यानंतरही अनेकदा नोकर कपातीची घोषणा केली होती. २२ जानेवारीला नोकर कपातीची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे.”