पीटीआय, नवी दिल्ली

करदात्यांच्या वैयक्तिक उत्पादनात वाढ झाल्याने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांमध्ये १० जानेवारीपर्यंत देशाचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन २४.५८ टक्क्यांनी वाढून १४.७१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. परतावा समायोजित केल्यानंतर, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १२.३१ लाख कोटी रुपये नोंदवले गेले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा १९.५५ टक्क्यांनी अधिक राहिले आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने बुधवारी दिली.

जागतिक पातळीवर प्रतिकूल वातावरण असतानादेखील गतिमानता कायम असूनही चालू आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या ८६.६८ टक्के निव्वळ संकलन आहे. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात १४.२० लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज अर्थसंकल्पात वर्तविला होता. व्यक्तिगत प्राप्तिकर, कंपनी कर, संपत्ती कर आदींचा समावेश असलेल्या प्रत्यक्ष कराचे सरकारचे संकलन सरलेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत दुहेरी अंकाने वाढले आहे. एप्रिल ते १० जानेवारी दरम्यान कंपनी कर १९.७२ टक्क्यांनी तर व्यक्तिगत प्राप्तिकरात ३०.४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेतील विविध घटकांनी कर संकलनवाढीस हातभार लावला आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’रूपी अप्रत्यक्ष करांच्या संकलनात चढती भाजणी सुरू असल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षांतदेखील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट ओलांडण्याची आशा आहे.

२.४० लाख कोटी परतावा वितरित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारकडून १ एप्रिल २०२२ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत २.४० लाख कोटी रुपयांचा परतावा वितरित करण्यात आला आहे. जो मागील वर्षाच्या याच कालावधीत वितरित केलेल्या परताव्याच्या तुलनेत ५८.७४ टक्के अधिक आहे.