Gold Silver Price Today : देशातील सराफा बाजारात सोमवारी सोने-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ३५० रुपयांनी तर चांदीचा भावही ३०० रुपयांनी घसरला. गेल्या आठवड्यातील मजबूत नफ्याचे भांडवलाचा फायदा घेण्यात सोने अयशस्वी ठरले, कारण नुकत्याच भावात झालेल्या वाढीनंतर व्यापाऱ्यांनी त्यांचा नफा घेणे जवळपास बंद केले आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव ३५० रुपयांनी घसरून ६०,१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ६०,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. आज दिल्लीत चांदीचा भावही ३०० रुपयांनी घसरून ७४,००० रुपये प्रति किलो झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १९१२ डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव २२.५० डॉलर प्रति औंस होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यातील मजबूत नफ्यातून मिळालेल्या भांडवलाचा फायदा घेण्यात सोने अपयशी ठरले. तसेच अलीकडील भावात झालेल्या वाढीनंतर व्यापाऱ्यांनी नफा कमावणे जवळपास बंद केले आहे.

हेही वाचाः IT पदवी घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; टाटांची टीसीएस ४० हजार जणांची भरती करणार

सोन्याच्या फ्युचर्समध्ये घसरण

सट्टेबाजांनी त्यांचे सौदे कमी केल्याने सोमवारी फ्युचर्स ट्रेडमध्ये सोन्याचा भाव ३९३ रुपयांनी घसरून ५९,०१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ३९३ रुपयांनी म्हणजेच ०.६६ टक्क्यांनी घसरून ५९,०१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आणि १३,८४८ लॉटसाठी उलाढाल झाली. सट्टेबाजांनी त्यांचे सौदे कमी केल्याने सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव ०.८३ टक्क्यांनी घसरून १,९२५.४० प्रति औंस डॉलर झाला.

हेही वाचाः पाकिस्तानात पेट्रोल झाले स्वस्त, प्रतिलिटर थेट ४० रुपयांची कपात, भारतात कधी होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीच्या दरातही घसरण

सोमवारी चांदीच्या फ्युचर्सचा भाव ३६७ रुपयांनी घसरून ७०,९२० रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ३६७ रुपयांनी म्हणजेच ०.५१ टक्क्यांनी घसरून ७०,९२० रुपये प्रति किलोवर आला आणि २०,५६८ लॉटसाठी उलाढाल झाली. न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भाव ०.६८ टक्क्यांनी घसरून २२.७४ डॉलर प्रति औंस झाला.