Gold-Silver Price Today:  चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असून आजही उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती झपाट्यानं वाढत आहेत. मागच्या दीड महिन्यात सोन्यानं महागाईचा उच्चांक गाठला आहे. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळाल्याने ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. पाहा तुमच्या शहरात आजचा भाव काय…

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७४,१५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७४,१२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९४,४८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९३,५६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold Silver Price 23 May
Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Gold Silver Price on 06 June
Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीने केला कहर, १० ग्रॅमचा दर ऐकून बाजारात पसरली शांतता!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Suresh Koshta, father of Ashwini Koshta
Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Gold Silver Price 30 May
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचा भाव कोसळला, १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात गर्दी

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,८५२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,०२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,८५२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७४,०२० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,८५२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७४,०२० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,८५२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,०२० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.