scorecardresearch

Premium

२०२४ मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना सुट्ट्याच सुट्ट्या, पुढील वर्षीच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

सुट्ट्यांचा विचार केला तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही नवीन वर्ष खूप चांगले जाणार आहे. केंद्र सरकारने २०२४ च्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे.

Holidays for central employees in 2024
(फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नोव्हेंबर महिना अर्ध्याहून अधिक उलटून गेला आहे. म्हणजे हे वर्ष संपायला जेमतेम दीड महिना उरला आहे. त्यानंतर नवीन वर्ष म्हणजेच २०२४ पहिल्या जानेवारीपासून सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांची नवी यादी लागू होणार आहे.

सुट्ट्यांच्या दोन याद्या असतात

सुट्ट्यांचा विचार केला तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही नवीन वर्ष खूप चांगले जाणार आहे. केंद्र सरकारने २०२४ च्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. सुट्ट्यांबाबत दिलेल्या निवेदनात दोन जोड देण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना केवळ पहिल्या संलग्नक रजाच मिळणार नाहीत, तर त्यांना दुसर्‍या सुट्ट्यांच्या यादीमधून ऐच्छिक रजाही मिळणार आहेत.

Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Prime Minister Modi firm assertion that the scheme is for the benefit of farmers
योजना शेतकरी हिताच्याच! पंतप्रधान मोदी यांचे ठाम प्रतिपादन
ST employees will undergo health check every two years
एसटीच्या कर्मचाऱ्यांची प्रत्येक दोन वर्षांत आरोग्य तपासणी होणार, जाणून घ्या योजनेबाबत…
Finance Minister nirmala sitaraman speech
Budget 2024 : पीएम आवास योजनेंतर्गत ५ वर्षांत आणखी २ कोटी घरे बांधणार; अर्थमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

सुट्ट्यांची दुसरी यादी

दुसऱ्या यादीतील सुट्ट्यांना प्रतिबंधित सुट्ट्या म्हणतात. दिल्ली किंवा नवी दिल्ली येथे तैनात असलेले केंद्रीय कर्मचारी दुसऱ्या यादीतून दोन सुट्ट्या निवडू शकतात, म्हणजे पर्यायी सुट्ट्यांची यादी आहे. तर ज्या कर्मचाऱ्यांची पोस्टिंग दिल्ली किंवा नवी दिल्लीच्या बाहेर आहे, ते पर्यायी यादीतून तीन सुट्ट्या निवडू शकतात.

दिल्ली/नवी दिल्लीच्या बाहेर पोस्ट केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राजपत्रित सुट्ट्या

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, बुद्ध पौर्णिमा, ख्रिसमस, दसरा (विजया दशमी), दिवाळी (दीपावली), गुड फ्रायडे, गुरु नानक जयंती, ईद-उल-फित्र, ईद-उल-जुहा, महावीर जयंती, मोहरम, पैगंबर मोहम्मदचा वाढदिवस (ईद-ए-मिलाद).

दिल्ली/नवी दिल्ली बाहेर पोस्ट केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सुट्ट्या

दसरा, होळी, जन्माष्टमी (वैष्णवी), रामनवमी, महा शिवरात्री, गणेश चतुर्थी/विनायक चतुर्थी, मकर संक्रांती, रथयात्रा, ओणम, पोंगल, श्री पंचमी/बसंत पंचमी, विशू/वैशाखी/वैशाखादी/भागी बिहूसाठी एक अतिरिक्त दिवस मशादी उगादी/चैत्र शुक्ल पक्ष/चेती चंद/गुढी पाडवा/पहिली नवरात्री/छठ पूजा/करवा चौथ.

ही २०२४ च्या गॅझेट सुट्ट्यांची यादी

 • २६ जानेवारी / प्रजासत्ताक दिन
 • २५ मार्च / होळी / सोमवार
 • २९ मार्च/ गुड फ्रायडे
 • ९ किंवा १० एप्रिल/ ईद-उल-फित्र/ मंगळवार किंवा बुधवार
 • १७ एप्रिल/ रामनवमी/ बुधवार
 • २१ एप्रिल/ महावीर जयंती/ रविवार
 • २३ मे/ बुध पौर्णिमा/ गुरुवार
 • १६ किंवा १७ जून ईद-उल-अधा/ रविवार किंवा सोमवार
 • १७ जुलै/ मोहरम/ बुधवार
 • १५ ऑगस्ट/ स्वातंत्र्य दिन/ गुरुवार
 • २६ ऑगस्ट/ जन्माष्टमी/ सोमवार
 • १५ किंवा १६ सप्टेंबर/ ईद-ए-मिलाद/ रविवार किंवा सोमवार
 • २ ऑक्टोबर/ गांधी जयंती/ बुधवार
 • १२ ऑक्टोबर/ दसरा/ शनिवार
 • ३१ ऑक्टोबर/ दिवाळी/ गुरुवार
 • ११ नोव्हेंबर /गुरुनानक जयंती/ शुक्रवार
 • २५ डिसेंबर/ ख्रिसमस/ बुधवार

‘या’ तारखांसह पर्यायी सुट्ट्यांची यादी आहे, कर्मचारी यापैकी कोणत्याही दोन सुट्ट्या घेऊ शकतात

 • १५ जानेवारी/ मकर संक्रांत/ सोमवार
 • १५ ते १८ जानेवारी/ पोंगल/ सोमवार किंवा गुरुवार
 • १४ फेब्रुवारी/ श्री पंचमी/वसंत पंचमी/ बुधवार
  १९ फेब्रुवारी/ शिवाजी महाराज जयंती
 • ८ मार्च/ महा शिवरात्री/ शुक्रवार
 • २० मार्च/ नवरोज / बुधवार
 • २५ मार्च /होळी/ सोमवार
 • ९ एप्रिल/ उगादी/चैत्र शुक्लदी/चेती चंद/गुढी पाडवा/ मंगळवार
 • १३ एप्रिल/ वैशाखी / वैशाखडी /शनिवार
 • १४ एप्रिल/ विशू/बोहाग बिहू/मेसादी/ रविवार
 • १७ एप्रिल/ रामनवमी/ बुधवार
 • ८ जुलै/ रथयात्रा /सोमवार
 • २६ ऑगस्ट/ जन्माष्टमी/ सोमवार
 • ९ सप्टेंबर/ गणेश चतुर्थी/विनायक चतुर्थी/ शनिवार
 • ७ ते १७ सप्टेंबर/ ओणम /गुरुवार
 • ३ ते १२ ऑक्टोबर/ शारदीय नवरात्री/ गुरुवार ते शनिवार
 • १२ ऑक्टोबर/ दसरा/ शनिवार
 • २० किंवा २१ ऑक्टोबर/ करवा चौथ/ रविवार आणि सोमवार
 • ७ ते ११ नोव्हेंबर/ छठपूजा/ गुरुवार ते रविवार

१२ ऐच्छिक सुट्ट्यांची यादी

 • होळी
 • जन्माष्टमी
 • राम नवमी
 • महाशिवरात्री
 • गणेश चतुर्थी/विनायक चतुर्थी
 • मकर संक्रांती
 • रथोत्सव
 • ओणम
 • पोंगल
 • श्री पंचमी/बसंत पंचमी
 • विशू / वैशाखी / वैशाखडी / भाग बिहू / मशादी उगाडी
 • चैत्र शुक्ल पक्ष/गुढीपाडवा
 • छठ पूजा/करवा चौथ

तीन सुट्ट्यांव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये या सुट्ट्या सक्तीने साजऱ्या करण्यात येणार

 • प्रजासत्ताक दिवस
 • स्वातंत्र्यदिन
 • महात्मा गांधी यांची जयंती
 • बुद्ध पौर्णिमा
 • नाताळचा दिवस
 • दसरा (विजया दशमी)
 • दिवाळी (दीपावली)
 • गुड फ्रायडे
 • गुरु नानक यांचा जन्मदिवस
 • ईद
 • ईद उल अजहा
 • महावीर जयंती
 • मोहरम
 • प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस (ईद-ए-मिलाद)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Holidays for central employees in 2024 complete list of next year holidays in one click vrd

First published on: 16-11-2023 at 16:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×