पीटीआय, नवी दिल्ली

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी यंदा २ डिसेंबरपर्यंत एकूण ७ कोटी ७६ लाख प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. चालू महिनाअखेरपर्यंत त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने सोमवारी लोकसभेत देण्यात आली.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
govardhan puja 2024 date
Govardhan Puja 2024 : जाणून घ्या गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी; गूगलवर ट्रेंड होतोय कीवर्ड
vidhan sabha election 2024
उमेदवारांच्या पारंपरिक प्रचारामुळे प्रिंटिंग व्यवसाय तेजीत
GST Collection in October 2024
GST Collection in October 2024: जीएसटी संकलन ऑक्टोबरमध्ये १.८७ कोटींवर, सहामाही उच्चांकी स्तर
Mhada mumbai
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : सुमारे ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी

केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तरादाखल दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १०.०९ कोटी पॅनधारकांनी २०२१-२२ सालात कमावलेल्या उत्पन्नासाठी कर भरला होता. चालू आर्थिक वर्षात २ डिसेंबरपर्यंत ७ कोटी ७६ लाख जणांनी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल केली आहेत. विवरपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे विवरणपत्रे भरणाऱ्यांची संख्या आणखी वाढणे अपेक्षित आहे.

आणखी वाचा-हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी, जुलै ते सप्टेंबर राज्यनिहाय मनुष्यबळ सर्वेक्षणातील वास्तव

आर्थिक वर्ष २०२-२३ मधील प्राप्तीसाठी पगारदार करदात्यांना विवरणपत्रे दाखल करण्याची मुदत ३१ जुलै होती. मात्र विलंब शुल्कासह विवरणपत्रे भरण्याची अंतिम मुदत ही ३१ डिसेंबरपर्यंत आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १६.६३ लाख कोटी रुपये होते. त्यापैकी प्राप्तिकरापोटी संकलन ८.०८ लाख कोटी रुपये होते.