IT कंपन्या २६ नव्या शहरांमध्ये विस्तारणार असून, महाराष्ट्रातील २ शहरांचा समावेश आहे, असं NASSCOM-Deloway India अहवालात म्हटले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, कौशल्ये, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि सरकारी पुढाकारांमुळे विस्तारात चाललेली २६ टियर २ शहरे तंत्रज्ञान हब बनण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये चंदीगड, जयपूर, लखनऊ, भोपाळ, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, विजयवाडा, मदुराई, त्रिची, कोईम्बतूर, म्हैसूर आणि कोची, दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टियर २ शहरांमध्ये कौशल्यावर कमी खर्च

टियर २ शहरांमधील कौशल्यावरील खर्च प्रस्थापित IT हबच्या तुलनेत सुमारे २५ ते ३० टक्के कमी आहे. प्रस्थापित आयटी हबच्या तुलनेत नवीन शहरांमध्ये रिअल इस्टेट भाड्यात ५० टक्के बचतदेखील आहे. खर्च बचतीसह ही उदयोन्मुख टियर २ शहरे जागतिक डिजिटल टॅलेंट हब म्हणून भारताच्या वाढीस हातभार लावण्यासाठी सुस्थितीत आहेत. सध्या भारतातील ११ टक्के ते १५ टक्के टेक टॅलेंट टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये राहतात आणि कामाच्या विकेंद्रीकरणामुळे उदयोन्मुख शहरांमधील लोकांसाठी अनेक नवीन संधी उघडल्या जात आहेत, असे अहवालात म्हटले आहे. अभियांत्रिकी, कला आणि विज्ञान शाखेतील भारतातील ६० टक्के पदवीधर हे छोट्या शहरांमध्ये आहेत, असे अहवालात म्हटले आहे. १४० पेक्षा जास्त ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) यांना या ठिकाणी आधीच घर सापडले आहे, जे या ठिकाणी जागतिक उद्योगांची वाढती आवड अधोरेखित करते.

हेही वाचाः एलॉन मस्कच्या संपत्तीत घट, मुकेश अंबानींची संपत्ती वाढली, अदाणी कोणत्या स्थानी? ‘हे’ आहेत जगातील टॉप १० अब्जाधीश

टियर २ शहरे देखील नावीन्यपूर्णतेसाठी महत्त्वाची केंद्रे बनली आहेत. देशातील एकूण स्टार्टअप्सपैकी जवळपास ३९ टक्के (७००० हून अधिक) या उदयोन्मुख टियर २ शहरांमध्ये कार्यरत आहेत, ज्यात सखोल तंत्रज्ञानापासून व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन (BPM) पर्यंतचे उद्योग आहेत. डेलॉइट इंडियाचे भागीदार सुमीत सलवान यांच्या मते, “पूर्वी मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित केले जात होते, परंतु महामारीनंतरच्या काळात देशभरात कामाचे लक्षणीय विकेंद्रीकरण झाले आहे. ही स्थाने जी सध्या १०-१५ टक्के टेक टॅलेंट आहेत, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारच्या वचनबद्धतेमुळे आशादायक वाढ करण्यास सक्षम आहेत. जर तुम्ही त्यांना मदत केली तर ते येतील.”

हेही वाचाः आदित्य L1 मिशनमध्ये ‘या’ तीन कंपन्यांची महत्त्वाची भूमिका, ‘असा’ होणार मोठा फायदा

NASSCOM मधील GCC आणि BPM च्या प्रमुख सुकन्या रॉय यांच्या मते, ही केंद्रे कंपन्यांना ताज्या आणि कुशल प्रतिभा, किफायतशीर ऑपरेशन्स आणि मजबूत पायाभूत सुविधांच्या रूपात आकर्षक फायद्यांचे मिश्रण देतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It companies to expand in 26 new cities including 2 cities in maharashtra vrd
First published on: 04-09-2023 at 17:21 IST