scorecardresearch

Premium

LPG Price Hike: काल मतदान संपलं, आज गॅस सिलिंडरची भाववाढ! मुंबईसह विविध शहरांमधील नवे दर जाणून घ्या

Gas Cylinder Price Hike: यापूर्वी ऑक्टोबरमध्ये, ओएमसीने व्यावसायिक एलपीजीच्या किमती २०९ रुपयांनी वाढवल्या होत्या, आणि त्याआधी सप्टेंबरमध्ये १५८ रुपयांची कपात झाली होती

LPG Gas Cylinder Price Hike As Election Voting of Madhya Pradesh Rajasthan and Five States Finished Yesterday Check New Prices
पाच राज्यांचे मतदान संपताच आज गॅस सिलिंडर महागला (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Commercial LPG Cylinder Price Today: सार्वजनिक क्षेत्रातील तेल विक्रेत्या कंपन्यांनी शुक्रवार, १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती २१ रुपयांनी वाढवल्याचे वृत्त आहे. दर वाढीनंतर, १९-किलोग्राम व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत नवी दिल्लीमध्ये १,७९६.५ रुपये आणि मुंबईमध्ये १,७४९ रुपये करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये किंमत १९६८.५ रुपये असेल तर कोलकातामध्ये १९०८ रुपये करण्यात आली आहे. हे दर आजपासून लगेचच लागू करण्यात येणार आहेत.

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी १६ नोव्हेंबरला व्यावसायिक एलपीजीच्या किमती ५७ रुपयांनी कमी झाल्या होत्या. तर आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांमध्ये मतदान पूर्ण होताच पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढवण्यात आले आहेत. येत्या ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा म्हणजेच मतमोजणी व निकाल असणार आहे.

Nashik Citylink bus
परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Maruti Car Discount Offers
नवीन कार खरेदी करताय? मारुतीच्या ‘या’ ५ स्वस्त गाड्यांवर मिळतोय बम्पर डिस्काउंट, ६२ हजार रुपयांपर्यंत होणार बचत!
railway freight loading increase in january 2024 compare to same month in last two year
मध्य रेल्वेची जानेवारीत सर्वाधिक मालवाहतूक

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये, ओएमसीने व्यावसायिक एलपीजीच्या किमती २०९ रुपयांनी वाढवल्या होत्या, आणि त्याआधी सप्टेंबरमध्ये १५८ रुपयांची कपात केली होती. इस्त्रायल-हमास युद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली होती परिणामी आता व्यावसायिक सिलिंडरचे भाव सुद्धा वाढले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lpg gas cylinder price hike as election voting of madhya pradesh rajasthan and five states finished yesterday check new prices svs

First published on: 01-12-2023 at 10:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×