निफ्टी निर्देशांक २५,७०० चा निर्णायकी टप्पा पार करण्यास अथवा २५,००० चा लक्ष्यवेधी, वर्तुळाकारी संख्येचा भरभक्कम आधार राखण्यास अपयशी ठरल्याने, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २४,७०० असेल… हे मागील लेखात सूचित केले होते. हे वाक्य काळाच्या कसोटीवर तपासता, सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांक २५,७०० चा स्तर पार करण्यास अपयशी ठरल्याचे दिसून आले. तर सप्ताहाच्या अखेरीस शुक्रवारी निफ्टी निर्देशांकांने २५,०००चा महत्त्वाचा स्तर तोडल्याने बाजारातील तेजीच्या धारणेला कलाटणी मिळाली. अशा परिस्थितीत निफ्टी निर्देशांकावरील लक्ष्यवेधी असा २५,००० चा स्तर आपण ‘महत्त्वाचा वळणबिंदू’(टर्निंग पाॅइंट) म्हणून डोळ्यांसमोर ठेवत निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटू या.

येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांक सातत्याने २५,००० चा स्तर राखण्यास यशस्वी ठरल्यास, या निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २५,१०० ते २५,२०० असेल. भविष्यात निफ्टी निर्देशांक सातत्याने २५,२००चा स्तर राखत असल्यास त्याचे वरचे लक्ष्य २५,५०० ते २५,८०० असेल. त्या उलट निफ्टी निर्देशांक सातत्याने २५,०००च्या स्तराखाली टिकत असल्यास त्याचे प्रथम खालचे लक्ष्य २४,८०० ते २४,५००, तर द्वितीय खालचे लक्ष्य २४,२०० ते २३,८०० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेड

१८ जुलैचा बंद भाव: २,३९४.२० रु.

तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, २२ जुलै

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,३५० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास: या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २,३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,४९० रुपये, द्वितीय लक्ष्य २,७०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: २,३५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,३०० रुपयांपर्यंत घसरण

२) झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेड

१८ जुलैचा बंद भाव : ८२६.४० रु.

तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, २२ जुलै

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ८०० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८८० रुपये, द्वितीय लक्ष्य ९५० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : ८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७७० रुपयांपर्यंत घसरण

३) इन्फोसिस लिमिटेड

१८ जुलैचा बंद भाव : १,५८६.१० रु.

तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, २३ जुलै

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,५५० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७४० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: १,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४८० रुपयांपर्यंत घसरण

४) पीसीबीएल केमिकल्स लिमिटेड

१८ जुलैचा बंद भाव : ४२०.४५ रु.

तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, २३ जुलै

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ४०० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास: या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४४० रुपये, द्वितीय लक्ष्य ४८० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : ४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३८० रुपयांपर्यंत घसरण

५) एसीसी लिमिटेड

१८ जुलैचा बंद भाव : १,९६९.९० रु.

तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार, २४ जुलैमहत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,९५० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १,९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,०३० रुपये, द्वितीय लक्ष्य २,१०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : १,९५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८२० रुपयांपर्यंत घसरण

६) सिप्ला लिमिटेड

१८ जुलैचा बंद भाव : १,४८२.३० रु.

तिमाही वित्तीय निकाल : शुक्रवार,२५ जुलै

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,४६० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १,४६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५४० रुपये, द्वितीय लक्ष्य १,६०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : १,४६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३८० रुपयांपर्यंत घसरण

– आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाँप लाँस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.