मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई हे वर्ष २०२३ मध्ये करार संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा वायदे बाजार अर्थात डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज म्हणून उदयास आले आहे. ‘फ्यूचर्स इंडस्ट्री असोसिएशन’च्या माहितीनुसार, सलग पाचव्या वर्षी एनएसईने हे स्थान कायम राखले आहे. याव्यतिरिक्त, वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्सचेंजेसद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार, एनएसईने २०२३ मधील व्यवहारांच्या संख्येनुसार इक्विटी वायदे विभागात जगात तिसरे स्थान पटकावले आहे.

हेही वाचा >>> देशात २,७०७ एकरांचे मोठे जमीन व्यवहार; गत वर्षभरात निवासी प्रकल्पांसाठी ७० टक्क्यांहून जास्त सौदे

credit card spending soar to 27 percent
क्रेडिट कार्ड उसनवारी २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर
DD News Logo changed
‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’, डीडी न्यूजच्या लोगोचा रंग केशरी केल्यानंतर विरोधकांची टीका
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर

सरलेले २०२३ साल हे राष्ट्रीय शेअर बाजारासाठी उल्लेखनीय ठरले आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवलाने ४ लाख कोटी (ट्रिलियन) डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. तर सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमईमधील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलाने १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टी निर्देशांकाने प्रथमच २२,००० अंशांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडण्याची कामगिरी केली. २०२३ या कॅलेंडर वर्षाच्या अखेरीस एनएसईवरील नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ८.५ कोटींवर पोहोचली आहे. सरलेल्या वर्षातील ३० नोव्हेंबर रोजी एका सत्रात १,६७,९४२ कोटी रुपयांच्या उलाढालीचा विक्रमदेखील एनएसईने नोंदवला. तर २ डिसेंबर २०२३ रोजी इक्विटी डेरिव्हेटिव्हमधील उलाढाल ३,८१,६२३ कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली.