बऱ्याचदा लोक त्यांच्या स्वप्नातील घर विकत घेण्यासाठी वर्षानुवर्षे कष्टाने कमावलेला प्रत्येक पैसा खर्च करतात. परंतु स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांची अनेक एजंट आणि तत्सम व्यक्तींकडून फसवणूकसुद्धा केली जाते. असाच एक प्रकार मुंबईत उघडकीस आला असून, त्यात एका बिल्डरने सुमारे १५० लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

घर खरेदीदारांची मोठी फसवणूक

इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, या प्रकरणात बंगळुरूमधील एका बिल्डरला अटक करण्यात आली आहे, ज्याचा मुंबईतील विरारमध्ये निवासी प्रकल्प होता. राजू सुलिरे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो मंदार हाऊसिंग नावाच्या रिअल इस्टेट कंपनीचा संचालक आहे. त्यानं १५० जणांना दोन फ्लॅट विकून ३० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

हेही वाचाः रिलायन्स इंडस्ट्रीज करणार देशातील सर्वात मोठी बाँड विक्री, २० हजार कोटी रुपये जमवणार

पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत

आरोपीला मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुख्य आरोपी सुलिरेचे साथीदार अविनाश ढोले, विपुल पाटील, अलाउद्दीन शेख आणि युसूफ खोतवाला अद्याप फरार आहेत. आरोपींनी या दोन फ्लॅटशिवाय अन्य मालमत्ता खरेदीदारांना अशाच प्रकारे फसवले आहे का? याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

हेही वाचाः टाटांची व्होल्टास विकली जाणार का? आता कंपनीनंच दिलं स्पष्टीकरण

म्हणून त्यांची फसवणूक झाली

मंदार हाऊसिंगचे विरार आणि नालासोपारा येथे बांधकामाधीन प्रकल्प आहेत. विरार पश्चिम येथील अर्नाळा पोलीस ठाण्यात अनेक पीडितांनी तक्रारी केल्या होत्या. २०११ ते २०१८ दरम्यान घर खरेदीदारांबरोबर फसवणुकीची ही प्रकरणे घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे १५० संभाव्य खरेदीदारांना आरोपींनी केवळ दोन-तीन फ्लॅट दाखवले, त्याने विक्रीचा करारही पूर्ण केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्माणाधीन प्रकल्पांची कागदपत्रेही बनावट असल्याचा पोलिसांना संशय

रिपोर्टनुसार, आरोपींनी पीडितांना तोच फ्लॅट दाखवला नाही, तर कागदपत्रेही तयार केली. पीडितांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्यास आरोपींनी त्यांना व्याजही देऊ केले. विरार आणि नालासोपारा येथील निर्माणाधीन प्रकल्पांची कागदपत्रेही बनावट असल्याचा संशय आता पोलिसांना येत आहे.