पेटीएम या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स व मोबाईल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने भारताच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये डिजिटल व्‍यवहार उपलब्‍ध करून देत इन-स्‍टोअर पेमेंट्समधील लीडर म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ केले आहे. पेटीएमचे साऊंडबॉक्‍स नाविन्‍यपूर्ण ऑडिओ डिवाईस आहे, जे व्‍यापाऱ्यांना पेटीएम क्‍यूआरच्‍या माध्‍यमातून मिळालेल्‍या प्रत्‍येक पेमेंटसाठी वॉईस नोटिफिकेशन्‍ससह मदत करते. दरम्यान, पेटीएमने व्यापाऱ्यांकरिता मराठी भाषेत पेमेंट अलर्ट्स मिळण्‍याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सध्‍या डिवाईसमध्‍ये मराठीसह १० भाषा उपलब्ध आहेत ज्यामध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्‍नड, मल्‍याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि ओडिया या भाषांचा समावेश आहे. हे डिवाईस व्‍यापाऱ्यांना पेमेंट्सवर देखरेख ठेवण्‍यास आणि चुकीचे व्‍यवहार व ग्राहकांकडून होऊ शकणाऱ्या फसवणूकीला प्रतिबंध करण्‍यास मदत करते.

Air India Recruitment 2024
Air India Recruitment 2024 : थेट मुलाखत! एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसकडून १४५ जागांसाठी भरती, २९ हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार
msrtc buses, Scrapped msrtc buses, Maharashtra ST Corporation, Scrapped buses, no data msrtc, good buses, bad buses, out of order buses, rti, maharashtra st, maharshtra buses, marathi news, maharashtra news,
धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही!
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

इन-स्‍टोअर पेमेंट्समधील आपले नेतृत्‍व अधिक दृढ करत पेटीएमने नुकतेच व्‍यापाऱ्यांसाठी दोन नवीन डिवाईसेस – पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स आणि पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स लाँच केले, ज्‍यामधून लहान दुकानांसाठी तंत्रज्ञानाचे नेतृत्‍व केले आहे. मेड इन इंडिया पेटीएम ऑल-इन-वन पॉकेट साऊंडबॉक्‍स नेहमी व्‍यस्‍त असलेल्‍या व्‍यापाऱ्यांसाठी अनोखा डिवाईस आहे. आणखी एक स्‍वदेशी डिवाईस पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स व्‍यवसायाला मनोरंजनाची जोड देतो.

(हे ही वाचा: Phone Pe चा मोठा निर्णय! यापुढेwww.loksatta.com/tech/phone-pe-marathi-notification-to-start-soon-big-good-news-smart-speaker-benefits-at-shopkeepers-in-maharashtra-tmb-01-3798256/ पेमेंट होताच ऐकू येणार मराठी आवाज)

पेटीएम साऊंडबॉक्‍स कशाप्रकारे ऑर्डर करावा?

• पेटीएम फॉर बिझनेस अॅप उघडा आणि साऊंडबॉक्‍स विभागामध्‍ये जा.
• नवीन डिवाईस पर्यायाचा शोध घ्‍या आणि त्‍यावर क्लिक करा.
• विनंती अर्ज भरा आणि योग्‍य उत्‍पादन व्‍हर्जनसाठी ऑर्डर करा.
• साऊंडबॉक्‍स तुम्‍हाला घरपोच डिलिव्‍हर केला जाईल.

पेटीएम साऊंडबॉक्‍स कशाप्रकारे ऑपरेट करावा?

• डिवाईसच्‍या डाव्‍या बाजूवरील रबरी हॅच खुला करत बॉक्‍ससह मिळालेले सिम इन्‍सर्ट करा.
• लाइट इंडिकेटर लाल व निळे करण्‍यासाठी पॉवर बटन प्रेस करून ठेवा.
• डिवाईस पेमेंट्स स्‍वीकारण्‍यासाठी कार्यान्वित होईल.
• मदतीसाठी सोबत दिलेल्‍या मॅन्‍युअलमधील अॅक्टिवेशनबाबतच्‍या सूचनांचे पालन करा.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ‘मेक इन इंडिया’ दृष्टीकोनाला पुढे घेऊन जात पेटीएमचा साऊंडबॉक्‍स १०० टक्‍के स्‍वदेशी उत्‍पादित करण्‍यात आलेले उत्‍पादन आहे. पेटीएमच्‍या पेमेंट सोल्‍यूशन्‍ससह साऊंडबॉक्‍सच्‍या व्‍यापक अवलंबतेने पेटीएमला भारतातील मोबाइल पेमेंट्सशी संलग्‍न केले आहे.