सनी देओलच्या गदर २ ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरूच ठेवली आहे. गदर २ चित्रपटाने आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. विशेष म्हणजे त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येत आहे. बाजारात सूचिबद्ध पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये सतत तेजीचे वातावरण आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई ३०० कोटींच्या पुढे गेली असली तरी या चित्रपटाच्या जोरावर PVR आयनॉक्सने एका आठवड्यात ११०० कोटींची कमाई केली आहे.

गदर २ च्या यशात आता पीव्हीआर आयनॉक्सचा शेअरदेखील सामान्य गुंतवणूकदारांमध्ये सुपरहिट ठरला आहे. एखादा मोठा चित्रपट सिनेमागृहात यशस्वी झाला की, शेअर बाजारातील थिएटर व्यवसायाशी संबंधित शेअर्समध्ये मोठी झेप घेतल्याचे क्वचितच पाहायला मिळते.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

एका आठवड्यात शेअर ७ टक्क्यांपर्यंत वाढला

गदर २ हा गेल्या शुक्रवारी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि त्या दिवसापासून पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. तर एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर ०.५५ टक्क्यांच्या घसरणीसह १६३१.१५ रुपयांवर बंद झाला. आज शुक्रवारी कंपनीच्या शेअरने १७४४.२० रुपयांसह दिवसाचा उच्चांक गाठला. याचा अर्थ कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारी आयनॉक्सच्या शेअर्समध्ये विक्रमी वाढ झाली. आजपर्यंत असे कधीच पाहायला मिळाले नव्हते.

हेही वाचाः विश्लेषण : १५ ते ३४ वयोगटातील तरुणांची सर्वात मोठी समस्या ‘नोकरी’, देशातील बेरोजगारीचे वास्तव मांडणारे सर्वेक्षण

आज कितीने वाढलेला दिसतोय शेअर्स?

जर आपणाला आजबद्दल बोलायचे झाले तर सकाळी ११:०५ वाजता PVR आयनॉक्सचे शेअर्स ०.३६ टक्क्यांनी म्हणजेच ६.२० रुपयांच्या वाढीसह १७२२.५० रुपयांवर व्यवहार करीत आहेत. कंपनीचा शेअर १७२५ रुपयांवर उघडला होता आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान १.६२ टक्क्यांनी वाढून १७४४.२० रुपयांवर पोहोचला होता. कंपनीचे शेअर्स एका दिवसापूर्वी १७१६.३० रुपयांवर बंद झाले आहेत.

हेही वाचाः मोदी सरकारच्या ESIC योजनेमुळे तरुणांना मिळाल्या नोकऱ्या, जूनमध्ये २० लाखांहून अधिक नवीन सदस्य जोडले

११०० कोटींची कमाई केली

दुसरीकडे जर आपणाला कंपनीच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर शेअर बाजारात पीव्हीआर आयनॉक्सच्या बाजारमूल्यात प्रचंड वाढ झाली आहे. गदर २ ने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे, परंतु पीव्हीआर आयनॉक्सने बाजारमूल्याच्या जवळपास ४ पट कमाई केली आहे. गेल्या आठवड्यात जेव्हा कंपनीचा शेअर १६३१.१५ रुपयांवर बंद झाला, तेव्हा बाजारमूल्य १५,९८१.४८ कोटी रुपये होते, जे आज वाढून १७,०८९.११ कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच गदर २ च्या यशाच्या जोरावर कंपनीने १,१०७.६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.