माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमधील एका प्रचारसभेत बोलताना केले होते. या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी फडणवीसांवर खोचक शब्दात टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत, असं ते म्हणाले. एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “ही किती मोठी शोकांतिका आहे, एक ठाकरे…”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!…

Prithviraj Chavan Uddhav Thackeray
“धडा घेणं गरजेचं”, सांगलीच्या जागेवरून पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या विरूद्ध…”
lok sabha elections 2024 rahul gandhi attacks bjp over dynasty politics
मंत्रिमंडळ नव्हे ‘परिवार मंडळ’; मंत्र्यांच्या घराणेशाहीवर बोट, राहुल गांधी यांची टीका
Mahayuti base remains Analysis by Devendra Fadnavis
महायुतीचा जनाधार कायम! देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण, उद्धव यांना सहानुभूती नसल्याचा दावा
Chandrapur lok sabha seat, Congress MP Pratibha Dhanorkar s Claim of bjp office bearers Support her in election, Chandrapur bjp office bearers,
चंद्रपूर : धानोरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजपत अस्वस्थता……पडद्यामागे राहून…
Chhagan bhubal and hasan mushrif
जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्याने छगन भुजबळांना घरचा आहेर; हसन मुश्रीफ म्हणाले, “मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल…”
Sambit Patra BJP Puri Lok Sabha elections Lord Jagannath is PM Modi bhakt
“भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त” या वक्तव्याचा संबित पात्रा यांना पुरी मतदारसंघात फटका बसेल का?
devendra fadnavis replied to sharad pawar
“शरद पवार सध्या नकारात्मक मानसिकतेत, त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीला..”; दुष्काळावरील टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर!
pm Narendra modi parmatma ka dut marathi news
प्रधानसेवक, चौकीदार आणि आता परमात्मा का दूत…

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

“खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच सुवर्णपदक मिळेल. आज ते ज्याला ईश्वराचा आशीर्वाद म्हणत आहेत, तो ईश्वाराचा आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत”, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस तुम्ही कुणाला येडं बनवता? अस म्हणत ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, रविवारी अकलूजमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी विश्वासघात केला, तर देव त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. “मी कोणाच्या वाट्याला जात नाही. कोणाचं वाईट चिंतत नाही आणि कोणाला त्रासही देत नाही. माझ्यावर ईश्वराचा आशिर्वाद आहे. आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आहे. पांडुरंगांचा आशिर्वाद आहे, पण कोणी माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडतच नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.