scorecardresearch

Premium

RBI ने रुग्णालय अन् शिक्षण संस्थांसाठी UPI व्यवहार मर्यादा वाढवली, आता ५ लाखांपर्यंत पेमेंट करता येणार

RBI increased UPI transaction limit : रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणात रेपो दर आणि इतर धोरणात्मक दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे कर्जाच्या ईएमआयवर कोणताही दिलासा मिळणार नाही.

UPI Transaction
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

RBI Monetary Policy (MPC) Meet : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशात UPI च्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामुळेच दर महिन्याला UPI व्यवहारांची संख्या वाढत आहे. आरबीआयने ऑफलाइन व्यवहारांसाठी UPI मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरणाच्या बैठकीत सांगितले की, रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमधील UPI व्यवहाराची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली.

रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अधिक पैसे भरता येणार

RBI च्या नव्या निर्णयानंतर आता UPI च्या मदतीने हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जास्त पेमेंट करता येणार आहे. नव्या धोरणानुसार, आता या ठिकाणी प्रत्येक व्यवहारासाठी १ लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांपर्यंत UPI द्वारे पेमेंट करता येणार आहे. या निर्णयामुळे या संस्थांमध्ये यूपीआयच्या वापराला चालना मिळणार आहे. रुग्णालयाची बिले आणि शाळा-कॉलेजची फी भरताना होणारी गैरसोय कमी होणार आहे.

Are Unmarried Women Entitled to Maternity Leave
अविवाहित गरोदर स्त्रियांनादेखील मिळू शकते का ‘Maternity Leave?’ कायद्यामध्ये नेमके काय ते जाणून घ्या…
Extension of deadline for Paytm Bank
पेटीएम बँकेच्या व्यवहारांना मुदतवाढ, रिझर्व्ह बँकेचा नेमका आदेश काय? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं!
New Taxation
Money Mantra : करावे कर समाधान – नवीन करप्रणाली : गृहकर्जावरील व्याजाची वजावट मिळते?
alibag ulhas bapat marathi news, maratha reservation marathi news, maratha reservation given from obc reservation marathi news
“ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देणे अशक्य”, घटना अभ्यासक उल्हास बापट यांचे मत

हेही वाचाः आरबीआयने आणखी पाच सहकारी बँकांवर उगारला कारवाईचा बडगा, एकाचा परवाना रद्द, चार बँकांना दंड

कर्ज EMI वर कोणतीही सवलत नाही

रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणात रेपो दर आणि इतर धोरणात्मक दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे कर्जाच्या ईएमआयवर कोणताही दिलासा मिळणार नाही. आरबीआयच्या पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल न झाल्याने बँकांना त्याच दराने कर्ज मिळत राहणार आहे. सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात कोणताही बदल केलेला नाही.

हेही वाचाः RBI MPC Meeting : महागड्या कर्जातून दिलासा नाहीच, रेपो दर ६.५ टक्क्यांवरच कायम

महागाईचा दर ५.४० टक्के राहील

२०२४ या आर्थिक वर्षात देशातील किरकोळ चलनवाढीचा दर केवळ ५.४० टक्के राहील, असा अंदाज शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये RBI ने महागाई दराचा अंदाज ५.४० टक्के कमी केला होता. गेल्या काही काळात खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीतही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. असे असूनही आरबीआयने महागाई दराचा अंदाज वाढवलेला नाही. दास म्हणाले की, पुरवठा साखळीसारखी अन्नधान्य महागाई वाढण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. चलनवाढीचा अंदाज देताना केंद्रीय बँकेने आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत महागाई दर ५.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.२० टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rbi has increased the upi transaction limit for hospitals and educational institutions now you can make payments up to 5 lakhs vrd

First published on: 08-12-2023 at 13:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×