Robert Kiyosaki ‘रिच डॅड पूर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जगभरात येणाऱ्या आर्थिक संकटाबाबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. कियोसाकी यांनी जगभरात आर्थिक संकट येणार असल्याचा इशारा दिला आहे. लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी म्हटलं आहे की कुठलंही संकट मोठं होतं कारण त्या संकटाच्या मूळाशी दडललेली समस्या सोडवली जात नाही.

कियोसाकी यांचं म्हणणं काय?

आर्थिक मंदीबाबत इशारा देत कियोसाकी म्हणाले, “१९९८ मध्ये वॉल स्ट्रीटने हेज फंड एलटीसीएमचं बेलाआऊट पॅकेज दिलं गेलं, २००८ मध्ये बँकांद्वारे वॉल स्ट्रीटचं बेलाआऊट दिलेलं पॅकेज हे सगळं जरा आठवा. त्यावेळीच विचारणा झाली होती की आता पुढे काय? २०२५ मध्ये जिम रिकार्ड्स विचारतात आहेत बँका कोण वाचवणार?”

कियोसाकी म्हणतात या सगळ्याची सुरुवात १९७१ मध्येच झाली आहे

कियोसाकी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर हेदेखील म्हटलं आहे की या सगळ्याची सुरुवात १९७१ मध्ये झाली. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष असलेल्या रिचर्ड निक्सन यांनी अमेरिकेन डॉलरला गोल्ड स्टँडर्ड पूर पासून वेगळं केलं. आता पुढचं संकट १.६ ट्रिलियन डॉलरच्या स्टुडंट लोकन डेट मार्केटच्या अधःपतनापासून सुरु होऊ शकतं. बचतीचे पारंपरिक पर्याय आता सुरक्षित नाहीत. मी रिच डॅड पूअर डॅड मध्ये २५ वर्षांपूर्वी लिहून ठेवलं आहे की श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत आणि बचत करणारे लोक हरलेले असतात. सरकारी बचावाचे पर्याय शोधण्याऐवजी लोकांनी आता गुंतवणुकीचे पर्याय आपल्या हाती घेतले पाहिजेत. सोनं, चांदी, बिटकॉईन यांच्यात गुंतवणूक करा आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा. मी माझ्या पुस्तकात जे म्हटलं होतं त्याची सुरुवात झाली आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा.

रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात…

प्रश्न- सध्याच्या घडीला सोनं, चांदी आणि बिटकॉईनचे दर गगनाला का भिडले आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर: मध्यवर्ती बँक सिस्टीम कोसळू लागली आहे, अनेक बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. त्यामुळे सोनं, चांदी आणि बिटकॉईनचे दर वाढत आहेत. मी देखील जास्त बिटकॉईन खरेदी करतो आहे. मला वाटतंय की बिटकॉनचा आलेख २५० K डॉलर्स असा या वर्षाच्या अखेरपर्यंत उंचावेल. जास्तीत जास्त बिटकॉईन खरेदी करा, विकू नका. असा सल्ला कियोसाकी यांनी दिला आहे. बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा ते पैसे सोनं, चांदी आणि बिटकॉईन मध्ये गुंतवले पाहिजेत असाच सल्ला कियोसाकी यांनी दिला आहे.