मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ केली, त्याचे सकारात्मक पडसाद रुपयाच्या मूल्यावर गुरुवारी उमटले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने गेल्या तीन आठवड्यातील सर्वोत्तम कामगिरी बजावताना, सत्रादरम्यान ३२ पैशांची मूल्य मजबुती साधली. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीला लगाम लावला जाण्याच्या शक्यतेने अन्य आशियाई चलनांतही डॉलरच्या तुलनेत सुधारणा दिसून आली.

जागतिक पातळीवर दोन बड्या बँकांच्या पतनानंतर अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ केली. शिवाय आगामी काळात व्याजदरवाढीबाबत नरमाईच्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. मात्र मध्यवर्ती बँकेने दरवाढीला पूर्णविराम देण्याची शक्यता नाकारली आहे. याचे प्रतिबिंब जगभरातील चलन व्यवहारांवर विपरित परिणाम दिसून आले.

Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

हेही वाचा >>>अदाणी देशातील आणखी विमानतळांसाठी बोली लावणार; कंपनीचे सीईओ म्हणाले, ”पुढील काही वर्षांत”

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारच्या सत्रात ८२.२७ रुपयांवर स्थिरावला. त्या आधी बुधवारच्या सत्रात रुपया ८२.६५ पातळीवर स्थिरावला होता. बाजार तज्ज्ञांच्या मते, डॉलरची आवक आणि तेल कंपन्यांकडून आयातीसाठी डॉलरची अधिक मागणी नसल्याने रुपया ८२.०८ या सत्रातील उच्चांकी पातळीवर टिकून राहू शकला नाही. डॉलर निर्देशांक सात आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला असून १०२ अंशांखाली खाली घसरला आहे. परिणामी चिनी युआन आणि थाई बातसारखी प्रमुख आशियाई चलनांचे मूल्य देखील ०.५ टक्क्यांनी सावरले आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८२.३८ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसअखेर तो ३२ पैशांनी वधारून तो ८२.२७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात रुपयाने ८२.०८ टक्क्यांची उच्चांकी तर ८२.४१ रुपयांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता.
अमेरिकेने महागाई विरोधातील लढा अजूनही जिंकलेला नसून अजूनही जागतिक पातळीवर बरीच अनिश्चितता आहे, असे मेक्लाई फायनान्शियलचे सहयोगी उपाध्यक्ष कुणाल कुराणी यांनी सांगितले. ताजे बँकिंग संकट तसेच युरो व पाउंड मजबूत बनल्याने डॉलरवर दबाव निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>जगातल्या टॉप १० श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी एकमेव भारतीय; अदाणी २ नंबरवरून थेट इतक्या क्रमांकावर घसरले

डॉलरची सलग सहाव्या सत्रात पीछेहाट

बँकांच्या पडझडीचा अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीबाबत नरमाईची भूमिका घेतली. आगामी पतधोरणात देखील पाव टक्केच व्याजदर वाढीची शक्यता आहे. दुसरीकडे मात्र युरोपात महागाईविरोधातील लढा तीव्र करण्यात आला असून, तेथील मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढीबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यापरिणामी डॉलरच्या तुलनेत युरो सात आठवड्यांच्या उच्चांकी म्हणजेच १.०९ प्रतिडॉलर या पातळीवर पोहोचला आहे. सलग सहाव्या सत्रात डॉलरची पीछेहाट कायम आहे.

जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त सहा चलनांच्या तुलनेत मोजमाप करणारा डॉलर निर्देशांक ०.२ टक्क्यांनी खाली आला. सप्टेंबर २०२१ नंतरची ही डॉलरच्या मूल्यातील सर्वात मोठी आणि सलग सहा सत्रांची सर्वात दीर्घ घसरणीची मालिकाही आहे.