खाद्यतेलाची आयात वाढण्याबरोबरच पामतेलाची आयातही झपाट्याने वाढत आहे. २०२२-२३ हंगामाच्या पहिल्या ११ महिन्यांत भारताची पामतेलाची आयात २९.२१ टक्क्यांनी वाढून ९०.८० लाख टन झाली आहे. पाम आणि खाद्यतेलाच्या आयातीतील ही वाढ देशांतर्गत रिफायनरींसाठी चिंतेची बाब असल्याचे एसईए(Solvent Extractors Association of India)ने म्हटले आहे. भारत हा जगातील वनस्पती तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे आणि गेल्या हंगामात भारताने ७०.२८ लाख टन पामतेल आयात केले होते. अशा परिस्थितीत २०२२-२३ च्या नोव्हेंबर-सप्टेंबर दरम्यान देशाची एकूण वनस्पती तेलाची आयात २० टक्क्यांनी वाढून १५६.७३ लाख टन झाली, जी मागील हंगामाच्या या कालावधीत १३०.१३ लाख टन होती.

पीटीआयच्या माहितीनुसार, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले की, सप्टेंबरमध्ये देशातील वनस्पती तेलाची आयात ५ टक्क्यांनी घसरून १५.५२ लाख टन झाली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत १६.३२ लाख टन होती. मुंबईस्थित सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ने सांगितले की, पाम उत्पादनांची आयात वेगाने वाढली आहे. पाम तेलाचा वाटा ५९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Heatwaves in india
देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उष्णतेची लाट; IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट कधी दिला जातो?
loksatta analysis causes of forest fires in uttarakhand
विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

हेही वाचाः It Sector Layoffs : टीसीएस ते इन्फोसिसपर्यंत आयटी कंपन्यांनी आतापर्यंत १६,१६२ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण कारण काय?

सोयाबीन आणि इतर तेलांची अधिक आयात

सोयाबीन आणि इतर तेलांच्या तुलनेत कच्च्या पाम तेलाच्या आयातीला थोडासा फटका बसला, या वर्षी सप्टेंबरमध्ये एकूण ७.०५ लाख टन आयात झाली, जी मागील महिन्यातील ८.२४ लाख टनांपेक्षा कमी आहे. पाम तेलामध्ये RBD पामोलिन, क्रूड पाम ऑइल (CPO), क्रूड ओलीन आणि क्रूड पाम कर्नल ऑइल (CPKO) यांचाही समावेश होतो.

हेही वाचाः जयपूरमध्ये १०० लॉकर्स, ५०० कोटींचा काळा पैसा अन् ५० किलो सोने; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

देशांतर्गत शुद्धीकरण उद्योगासाठी आयात

SEA च्या मते, पुरेशी देशांतर्गत उपलब्धता असूनही देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतीत तीव्र घट झाल्याने मागणी वाढली आहे. देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने अलीकडच्या काही महिन्यांत दरडोई वापर वाढला आहे, असेही SEA ने म्हटले आहे. त्याचबरोबर पाम तेलाच्या आयातीमुळे देशांतर्गत शुद्धीकरण उद्योगावर गंभीर परिणाम झाला आहे. वर्ष २०२२-२३ च्या नोव्हेंबर-सप्टेंबर या कालावधीत एकूण शुद्ध तेल (RBD पामोलिन) आयात २०.५३ लाख टनांवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १७.१२ लाख टन होती. SEA च्या मते, याचा घरगुती पाम तेल शुद्धीकरण उद्योगाच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे.