Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७०,९०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८१,१२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८१,२६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६४,८७३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,७७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये आहे.

Retrenchment of staff by Hindu Muslim hotel owners in uttar Pradesh
हिंदू-मुस्लीम हॉटेल मालकांकडून कर्मचारी कपात
aloja Central Jail, Taloja Central Jail Implements AI Powered Surveillance, CCTV Cameras in Taloja central jail, Security and Transparency, Taloja news, panvel news,
तळोजा कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर तिसर्‍या डोळ्याची नजर
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
police, pune, drunk drivers,
पुणे : मद्यपींकडून पोलिसांच्या तिजोरीत कोट्यवधींची भर, दीड महिन्यात १६८४ जणांवर कारवाई; १२ कोटींचा दंड वसूल
What to do if water enters the petrol tank of a bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईकच्या पेट्रोलच्या टाकीत पाणी शिरल्यास काय कराल? ‘या’ ट्रिक्स येतील कामी
mars saturn sextile What does this planetary movement mean for your zodiac sign magal shani sextile at 60 degree angle these zodiac sign will get rich soon
आता पालटणार ‘या’ राशींचे नशीब! १०० वर्षांनंतर शनि अन् मंगळाचा दुर्मीळ संयोग; अचानक होणार धनलाभ, तिजोरी भरणार?
Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती
mumbai reports 3 thousand dog bite incidents in three years
श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ; मुंबईत तीन वर्षांत ३ हजार श्वान चाव्याच्या घटना

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.