कोळसा मंत्रालयाने ऑक्टोबर २०२३ महिन्यामध्ये एकूण कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या ६६.३२ एमटी उत्पादनात १८.५९ टक्क्यांची वाढ नोंदवत यावर्षी कोळसा उत्पादन ७८.६५ दशलक्ष टन (एमटी) पर्यंत पोहोचले आहे. कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे उत्पादन १५.३६ टक्क्यांच्या वाढीसह ऑक्टोबर २०२२ मधील ५२.९४ एमटीच्या तुलनेत यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ६१.०७ एमटीपर्यंत वाढले आहे. आर्थिक वर्ष २२-२३ मधील एकत्रित कोळसा उत्पादन (ऑक्टोबर २०२३ पर्यंत) ४४८.४९ एमटीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये याच कालावधीतील १३.०५ टक्के वाढ नोंदवत ५०७.०२ एमटीपर्यंत लक्षणीय वाढले आहे.
याव्यतिरिक्त ऑक्टोबर २०२३ मध्ये कोळसा वितरणामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये नोंदवलेल्या ६७.१३ एमटी वितरणाच्या तुलनेत यावर्षी १८.१४ टक्क्यांच्या वाढीसह उत्कृष्ट प्रगती दर्शवत यावर्षी कोळसा वितरण ७९.३० एमटीवर पोहोचले आहे. कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने कोळसा वितरणात लक्षणीय कामगिरी केली आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये ५३.६९ एमटी वितरणाच्या तुलनेत १४.८३ टक्क्यांची वाढ दर्शवत ऑक्टोबर २०२३ मध्ये ते ६१.६५ एमटीपर्यंत पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये एकत्रित कोळसा वितरणात (ऑक्टोबर २०२३ पर्यंत) ११.९८ टक्क्याने वाढ होऊन त्याने ५४१.७३ एमटी हा आकडा गाठला आहे. आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये याच काळात एकत्रित कोळसा वितरण ४८३.७८ एमटी इतके होते.
हेही वाचाः मुंबईत मिळतात सर्वात महागडी घरे, किमती वाढण्याच्या बाबतीत जगातील टॉप ५ शहरांमध्ये समावेश
कोळसा उत्पादन आणि चढ-उतार या दोन्हीमध्ये झालेली लक्षणीय वाढ, देशाच्या प्रगतीशील ऊर्जेची स्वयंपूर्णता अधोरेखित करते आणि भविष्यातील ऊर्जा मागणी पूर्ण करण्याच्या निर्धाराला बळ देते. अखंड कोळशाचे उत्पादन आणि वितरण सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर कोळसा मंत्रालय दृढ आहे. यामुळे देशाच्या निरंतर विकासाला चालना देणारा विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा सुनिश्चित होईल.