मुंबई : भांडवलाची चणचण असलेल्या दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन-आयडिया लिमिटेडने शुक्रवारी फॉलो-ऑन समभाग विक्रीच्या (एफपीओ) माध्यमातून १८,००० कोटी रुपये उभारण्याची योजना घोषित केली. प्रति समभाग १० ते ११ रुपये किमतीवर जाहीर झालेली ही समभाग विक्री १८ एप्रिलला सुरू होऊन, २२ एप्रिलपर्यंत सुरू राहील.
वर्षाच्या सुरुवातीला, व्होडाफोन आयडियाने समभाग विक्री आणि कर्ज याद्वारे ४५,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली होती. त्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळाने ११ एप्रिलला झालेल्या बैठकीत १८,००० कोटी रुपयांच्या सार्वजनिक समभाग विक्री प्रस्तावाला (एफपीओ) मंजुरी दिली.

भांडवल उभारणी समितीने शुक्रवारी १२ एप्रिलला झालेल्या बैठकीत, विक्रीसाठी समभागांच्या किमतीचा पट्टा मंजूर केला, असे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेत म्हटले आहे. प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलद्वारे मोठ्या फरकाने पिछाडीवर लोटल्या गेलेल्या या कंपनीला यातून तिची बाजारपेठेतील स्थिती सुधारण्यास आवश्यक बळ मिळणे अपेक्षित आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

हेही वाचा…सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक

या महिन्याच्या सुरुवातीला आदित्य बिर्ला समूहाने प्राधान्यक्रमाने समभाग विक्रीद्वारे (प्रेफरेंशियल शेअर) २,०७५ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. खूप विलंबाने ५जी सेवांचे दालन खुले करणाऱ्या व्होडाफोन-आयडियाची ग्राहकसंख्या महिनागणिक घटत चालली आहे. कंपनीवर एकंदर २.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज आणि दर तिमाहीगणिक वाढत असलेल्या तोट्याने ग्रासले आहे. जानेवारी २०२४ मध्ये १५.२ लाख ग्राहक गमावत, कंपनीची एकूण ग्राहक संख्या २२.१५ कोटीपर्यंत घटली आहे.

हेही वाचा…Gold-Silver Price on 12 April 2024: सोने-चांदी महागले, १० ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत ‘एवढे’ पैसे

शुक्रवारी कंपनीच्या एफपीओच्या घोषणेच्या परिणामी व्होडाफोन-आयडियाचा समभाग १२.९५ रुपयांवर दिवसअखेर स्थिरावला होता. त्या तुलनेत प्रत्येकी १० रुपये ते ११ रुपये निश्चित करण्यात आलेली विक्री किंमत ही गुंतवणूकदारांना १५ टक्के सूट देणारी आहे. दरम्यान सीजीक्यू पार्टनर्स आणि एसबीआय म्युच्युअल फंड या सारखे संस्थात्मक गुंतवणूकदार या एफपीओमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.