पीटीआय, नवी दिल्ली

अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ होऊनही घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये घसरून ०.२ टक्के असे चार महिन्यांच्या नीचांकी नोंदवला गेला, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले.

The central government has not given new permission for onion export but the open export of onion from the country is closed
कांद्याची खुली निर्यात बंदच, केंद्राचे आकडे गेल्या वर्षभरातील
heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Scheme for women Assemblies Candidates for women Prime Minister Narendra Modi
पहिली बाजू: महिला सशक्तीकरणाची नवी पहाट

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत नकारात्मक राहिली होती आणि नोव्हेंबरमध्ये ती ०.२६ टक्के अशी सकारात्मक झाली होती. तर फेब्रुवारी २०२३ मध्ये घाऊक महागाई ३.८५ टक्के नोंदवला गेला होता.

हेही वाचा >>>सरकारी बँकांना सुवर्ण तारण कर्जाचे पुनरावलोकन करण्याच्या सूचना

चालू वर्षातील जानेवारीतील ६.८५ टक्क्यांवरून फेब्रुवारीत अन्नधान्य महागाईचा दर मात्र ६.९५ टक्के असा चढाच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. प्राथमिक खाद्यपदार्थांच्या प्रमुख १० पैकी आठ घटकांच्या किमतीत जानेवारीच्या तुलनेत जास्त वाढ नोंदवली गेली, तर पाच वस्तूंच्या किमतीतील वाढीची दोन अंकी व अधिक नोंदवली गेली भाज्यांमधील किमत वाढीची पातळी जानेवारीतील १९.७१ वरून १९.७८ टक्के अशी वधारली, तर फेब्रुवारीमध्ये डाळींमधील महागाई दर १८.४८ टक्के असा वधारला. सरलेल्या जानेवारीतही डाळी १६.०६ टक्के दराने कडाडल्या होत्या.

हेही वाचा >>>ढोलेरातून २०२६ मध्ये पहिली चिप निर्मिती; वैष्णव यांची माहिती; टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन

इंधन आणि ऊर्जा विभागातील महागाई जानेवारीतील ०.५१ टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये उणे १.५९ टक्के नोंदवण्यात आली. उत्पादित वस्तूंची महागाई फेब्रुवारीमध्ये आणखी कमी होत उणे १.२७ टक्क्यांवर पोहोचली. जी जानेवारी महिन्यात उणे १.१३ टक्के होती. गव्हातील महागाईदर २.३४ टक्के नोंदवला गेला. तर दूध ५.४६ टक्के आणि प्रथिनेयुक्त आहार असलेल्या अंडी, मांस आणि मासे यांतील महागाई दर उणे ०.४७ टक्के राहिला आहे.

दोन दिवसांपूर्वीच जाहीर झालेला किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये ५.०९ टक्के, असा त्याआधीच्या महिन्याच्या म्हणजेच जानेवारीमधील पातळीच्या जवळसपास नोंदवला गेला. तथापि हा दर रिझर्व्ह बँकेकडून निर्धारित ४ टक्क्यांच्या समाधान पातळीच्या अद्याप वरच आहे.