स्मार्टफोनमधील डेटा कनेक्टिव्हिटीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिम कार्ड असते. हे सिम कार्ड युजर्सची ओळख करून त्यांना फोन नंबर प्रदान करते. मात्र, जग जसजसे प्रगती करत चालले आहे तसतसे तंत्रज्ञानातही अनेक बदल होत आहेत. यापैकी एक नवीन ट्रेंड ई-सिमचा आहे, ज्याने आता प्रत्यक्ष सिम कार्ड बदलण्यास सुरुवात केली आहे. हे फिजिकल सिमची गरज पूर्णपणे काढून टाकणार आहे. यामुळे लोकांना प्रत्यक्ष सिम कार्ड मोबाइल फोनमध्ये न टाकता कोणत्याही त्रासाशिवाय सर्व दूरसंचार सेवा वापरण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पण ई-सिमचे युग खरेच आले आहे का? एअरटेलचे गोपाल विठ्ठल यांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
त्यांनी ई-सिमबाबत सूचना दिल्या
दूरसंचार कंपनी एअरटेलचे सीईओ गोपाल विठ्ठल यांचे मत आहे की, ई-सिम हे फिजिकल सिम कार्डपेक्षा अनेक बाबतीत चांगले आहे. अनेक मिडरेंज आणि प्रीमियम स्मार्टफोन्स आता युजर्सना ई-सिम वापरण्याचा पर्याय देत आहेत आणि सर्व प्रमुख दूरसंचार कंपन्यादेखील ई-सिम ऑफर करीत आहेत. कारण ई-सिमचे फोन चोरी रोखण्यापासून डेटा ट्रान्सफर करण्यापर्यंतचे अनेक फायदे देत आहेत.
चोरीचा मागोवा घेणे सोपे होणार
तुम्ही तुमच्या फोनमध्ये ई-सिम वापरल्यास ते हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती कमी होते. खरं तर कोणीही प्रत्यक्ष सिम कार्ड फेकून किंवा तोडू शकतो, परंतु ई-सिममध्ये असे करणे शक्य होणार नाही. अशा प्रकारे फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तो चालू होताच ट्रॅक करता येतो. सिम कार्ड हा फोनच्या व्हर्च्युअल सॉफ्टवेअरचा एक भाग असल्याने फोनचे लोकेशन ट्रेस करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
हेही वाचाः Money Mantra : कार्ड टोकनायझेशनमुळे तुमच्या गोपनीयतेला धोका नाही, जाणून घ्या कसे कार्य करते?
अनेक उपकरणे जोडली जाऊ शकतात
ई-सिम सेवेसह एकमेकांशी जोडलेल्या उपकरणांना त्याच क्रमांकाशी जोडण्याचा पर्याय दिला जात आहे. उदाहरणार्थ, मोबाईल फोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत सर्व उपकरणे एकमेकांशी जोडली जाऊ शकतात आणि त्या सर्वांवर दूरसंचार सेवा उपलब्ध आहेत. म्हणजे जर तुम्हाला फोनऐवजी फक्त स्मार्टवॉच वापरायचे असेल किंवा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त फोन असतील, तर एक ई-सिम सर्वांना कनेक्टिव्हिटी देऊ शकते.
अशा प्रकारे ई-सिम वापरा
जर तुम्हाला ई-सिम वापरणे सुरू करायचे असेल, तर प्रथम तुमच्या फोनची अनुकूलता तपासा. जर तुमचा फोन ई-सिमला सपोर्ट करत असेल तर तुम्हाला टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क साधावा लागेल. Jio पासून Airtel आणि Vi पर्यंत प्रत्येक जण ई-सिमचा पर्याय देत आहे. तुम्ही तुमचे फिजिकल सिम कार्ड ई-सिममध्ये रूपांतरित करू शकता.