Google Pay Shutting Down : डिजिटल पेमेंट ॲप आता जगभरात लोकप्रिय झालेले आहेत. रोख रक्कम नसणे, सुट्ट्याची कटकट यामुळे ॲपद्वारे खरेदी-विक्री करण्याच्या व्यवहारात वाढ झाली आहे. नुकतेच भारतात पेटीएम कंपनीचा गैरव्यवहार समोर आल्यानंतर अनेक पेटीएम वापरकर्त्यांचे पैसे वॉलेटमध्ये अडकले आहेत. त्यानंतर आता गुगल पे बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ४ जून २०२४ रोजी अमेरिकेत गुगल पे ॲप बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. याबदल्यात वापरकर्त्यांना गुगल वॉलेटचा पर्याय गुगलकडून देण्यात आला आहे.

गुगलने प्रसिद्ध केलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, अमेरिकेत यापुढे गुगल पे ॲपऐवजी गुगल वॉलेट ॲप वापरण्यात यावे. गुगल पे मधील बॅलन्स इतर ठिकाणी वळविण्यात यावा. अमेरिकेत जरी गुगल पे बंद होणार असले तरी भारत आणि सिंगापूरमध्ये ॲप सुरुच राहणार आहे. भारत आणि सिंगापूरमधील आमच्या कोट्यवधी ग्राहकांना या नव्या बदलांचा कोणताही फरक पडणार नाही. भारतातील ग्राहक गुगल पेच्या मदतीने पैसे स्वीकारू शकतात आणि पाठवू शकतात.

WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
india post payment bank scam
India Post Payments Bank धारकांनो सावधान! अन्यथा तुमचेही अकाउंट होईल रिकामी; टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज
Did panipuri vendor get GST notice for earning Rs 40 lakh Here's the truth
Fact Check : पाणीपुरी विक्रेत्याने ४० लाख कमावल्याचा दावा खोटा! जीएसटी नोटीसच्या व्हायरल फोटोचे जाणून घ्या सत्य….
infosys salary
नारायण मूर्ती यांच्या ‘Infosys’ने पुढे ढकलला पगारवाढीचा निर्णय; कारण काय? आयटी कंपन्यांची स्थिती काय?
ncpi google pay phonepe loksatta
‘एनसीपीआय’कडून ‘गूगलपे’ आणि ‘फोनपे’ला कोणता दिलासा? याच दोन कंपन्यांची डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात मक्तेदारी का?

Gmail सेवा बंद होणार? कंपनीचं पत्र व्हायरल; एलॉन मस्कच्या ‘त्या’ बंदूक पोस्टने चर्चेला उधाण; खरा निर्णय काय?

अमेरिकेतील ग्राहकांनी गुगल पेच्या ऐवजी गुगल वॉलेट ॲपचा पर्याय दिला आहे. या ॲपमध्ये डेबिट-क्रेडिट कार्ड व्हर्चुअली वापरले जाऊ शकते. तेसच तिकीट, पासेस आणि ‘टॅप टू पे’चा पर्याय गुगल वॉलेटमध्ये आहे. गुगल पे अॅप बंद होणार असले तरी वापरकर्ते गुगल पे वेबसाईटवरून बॅलन्स तपासू शकतात तसेच बँक खात्यात पैसे वळवू शकतात.

पेटीएमला टक्कर देण्यासाठी गुगलचा साऊंडपॉड

पेटीएम कंपनी अडचणीत आल्यानंतर दुकानदारांना मदत करण्यासाठी गुगलने आता स्वतःचा साऊंडपॉड बाजारात आणण्याची तयारी केली आहे. पेटीएमच्या साऊंडबॉक्समुळे दुकानदारांना मोठी मदत होते. यूपीआयद्वारे पेमेंट केल्यानंतर साऊंडबॉक्सद्वारे त्याची खातरजमा दुकानदार करत असतात. यामुळे प्रत्येकवेळी मोबाइलवर आलेला मेसेज तपासण्याचा वेळ वाचतो. मात्र पेटीएम अडचणीत आल्यानंतर दुकानदारांसमोर प्रश्नचिन्ह होते. यातच गुगलने स्वतःचा साऊंडपॉड आणण्याची तयारी केली आहे.

Story img Loader