यशवंतराव चव्हाण यांना त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीला बोलावले. त्यावेळेस महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांनी याचे वर्णन ‘हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेला’ अशा उल्लेखासह केले होते. देशाच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील उदयोगपतींनीसुद्धा यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहून संरक्षण खात्याला लागणारे उत्पादन सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. आज बाबा कल्याणी, त्यांचे वडील आणि आजोबा यांनी सुरू केलले काम पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. फक्त संरक्षण खातेच नव्हे, तर भारताची उद्याची बाजारपेठ, अवकाश क्षेत्रात भविष्यात प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

बाबा कल्याणी यांचे कौतुक यासाठी की, त्यांना झटपट पैसे देणाऱ्या अनेक वेगळ्या वस्तूंच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करून पैसाही कमावता आला असता आणि कंपनीलासुद्धा आणखी मोठे करता आले असते. परंतु बाबा कल्याणी यांचे वडील नीळकंठ कल्याणी आणि त्यांचे आजोबा आण्णाप्पा कल्याणी असा भारत फोर्जचा वारसा तीन पिढ्यांचा आणि कर्तृत्वही तितकेच मोठे आहे. दूरदृष्टी असलेले राजकारणी उद्योजकांच्या मदतीला येतात. त्यांना उत्तेजन देतात. शंतनूराव किर्लोस्कर यांच्यासारखे उद्योगपती नीळकंठ कल्याणी यांना मदत करतात. अशा प्रकारे अर्थकारण, राजकारण आणि महाराष्ट्राचे औद्योगिकीकरणाचा इतिहासही भारत फोर्जच्या इतिहासाशी जुळलेला आहे. निळकंठराव कल्याणी सीकॉमचे अध्यक्ष असताना नाशिकला आलेले असता, त्यांची मुलाखत त्यांच्याच गाडीत बसून अत्यंत कमी वेळात घेण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे आजचे बाबा कल्याणी यांचे यश हे त्यांचे एकट्याचे यश नाही, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या घराण्यातील अनेकांचे योगदान तर आहेच पण राजकारणातल्या व्यक्तींची मदत तितकीच मोलाची आहे हे नक्की.

homes, mill workers, mmrda
संथ कारभाराचा गिरणी कामगारांना फटका, रांजनोळीतील १२४४ घरांची दुरुस्ती रखडलेली; २५२१ घरांची सोडतही लांबणीवर
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!

हेही वाचा – लक्ष्मीची पावले  : फंड विश्वातील अनुभवी सेनानी.. – कैलाश कुलकर्णी

बाबा कल्याणी हे रोल्सराईस या कंपनीलासुद्धा आवश्यक सुटे भाग पुरवठा करणारे महाराष्ट्रातील उदयोजक आहेत. तसेच ते राफेल, एअरबस, बोंईग आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अशा अनेक कंपन्यांचे ओईएम (मूळ उपकरण निर्माते) म्हणून कार्यरत आहेत. ते या जगन्मान्य कंपन्यांना जे सुटे भाग पुरवतात ते काम अत्यंत कठीण आहे. परंतु आव्हान स्वीकारण्यातच खरी मजा असते. विशेषतः संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या उत्पादनासाठी अनेक नवनवीन उद्योजक पुढे येत आहेत. अशावेळेस कल्याणी यांनी केलेले कार्य अभिनंदनास पात्र आहे. बाजार मोठा होतो तो अशा उद्योजकांमुळे. रशियाच्या अगोदर अमेरिकेने अंतराळ स्पर्धेत यशस्वी झाले पाहिजे आणि चंद्रावर मानव पाठविण्याच्या स्पर्धेत अमेरिकेने प्रथम यश मिळविले पाहिजे, असे स्वप्न माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांनी बघितले आणि अमेरिकेत उद्योजकांनी एरोस्पेस या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले देखील. म्हणून भारतातसुद्धा संरक्षण क्षेत्राला सामग्री पुरवठा करणाऱ्या कंपन्या वाढल्या पाहिजेत.

कल्याणी घराणे उद्योजकाचे घराणे नव्हते. अनेक पिढ्यांपासून वडिलोपार्जित शेती, तीन-चार पिढ्यांपासून चालत आलेला व्यापार उत्तम प्रकारे करणारे नारायण शेठ मादप्पा कल्याणी एक धनिक व्यापारी होते. मोठी असामी म्हणून ते ओळखले जात. हळद, गूळ, शेंगा विकत घ्याव्यात, कोकणात जाऊन विकाव्यात अशा वेळेस वडिलोपार्जित व्यवसाय चालू ठेवणे, निळकंठराव कल्याणी यांनासुद्धा फारच सोपे होते. परंतु त्यांनी धाडस दाखविले आणि उद्योगाविषयी काहीही माहिती नसताना कारखाना सुरू करण्याचे ठरविले. तो सर्व इतिहास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे, शंतनूराव किर्लोस्कर यांनी निळकंठरावांना फक्त फोर्जिंगचा कारखाना सुरू करण्याऐवजी क्रॅकशाफ्ट तयार करण्याचा परवाना घ्या. अमेरिकेत हे दोन्ही प्रकल्प एकमेकांना पूरक असतात. झाले कल्याणी यांनी दिल्लीला चकरा मारण्यास सुरुवात केली. परवाने मिळवणे हे आजच्या इतके सोपे नव्हते. सर्व संकटावर मात करून २० जुलै १९६२ ला भारत फोर्जने २ कोटी ३० लाख रुपयांचे भागभांडवल उभारण्यासाठी कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूजकडे परवानगी मागितली. २४ सप्टेंबर १९६२ रोजी ही परवानगी मिळाली. या काळात आजच्या सारखे सहजपणे भांडवल गोळा करणे अशक्य होते. जागेसाठी त्यावेळचे महाराष्ट्र सरकारचे उद्योगमंत्री स. गो. बर्वे यांनी मदत केली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. ते सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत गेले. जाताना त्यांनी सूचना केली, त्यानुसार भारत फोर्जला संरक्षण खात्याने जी जागा दिली ती वापरता आली आणि त्यानंतर मग अनेक पुढच्या संकटांना सामोरे जावे लागले. तो इतिहाससुद्धा फार मोठा आहे.

निळकंठरावांचा प्रयत्नवादावर गाढा विश्वास होता. परंतु त्यांच्या आयुष्यातील आलेले तीन प्रसंग सांगताना त्या प्रसंगातून ते वाचले त्याबद्दल एका वाक्यात ते उल्लेख करतात – “माझा अशा दैववादावर विश्वास नाही, परंतु मी कसा वाचलो हेही सांगता येणे मला शक्य नाही.” बाबा कल्याणी यांना त्यांच्या वडिलांच्या आयुष्यातील प्रसंग विसरता येणार नाहीत. १९६४ ला निळकंठरावांनी सर्वस्व पणाला लावून भारत फोर्ज ही कंपनी उभी केली आणि बाबा कल्याणींनी ती आणखी मोठी केली. महाराष्ट्रातल्या या उद्योजकाला महाराष्ट्र बँक, साताऱ्याची विमा कंपनी यांनी तर मदत केलीच, परंतु कॅनरा बँकेचे टी. ए. पै यांनीसुद्धा मदत केली.

हेही वाचा – Money Mantra : केतन पारेख घोटाळा (भाग २)

कल्याणी उद्योग समूहाचा पसारा नंतर खूप वाढला. भांडवल बाजार आता प्रगत झालेला आहे. पूर्वीच्या तुलनेने भांडवल उभारणी सोपी झालेली आहे. परंतु ६० वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती याची थोडीशी कल्पना करून देण्याचा हा माफक प्रयत्न. बाबा कल्याणी अमेरिकेत एमआयटी या जगप्रसिद्ध संस्थेत शिक्षण घेऊन परत आले. त्यांनी जुन्या व नव्याची यशस्वी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीसुद्धा काही चुका घडल्या. उद्योजकाला चुका करण्याचा अधिकार असलाच पाहिजे. विशेषतः कौटुंबिक कलह त्रासदायक ठरतात, त्यावर मात करणे अवघड होते, काही वेळा जुने विचार आणि नवीन विचार हा संघर्ष अवघड असतो. त्यात पुन्हा कामगार अशांतता यांनासुद्धा तोंड द्यावे लागते. भारत फोर्जलासुद्धा या संकटाला सामोरे जावे लागले. फोर्जिंगचा उद्योग हा देशातल्या वाहन उद्योग, ट्रॅक्टर उद्योग व डिझेल इंजिन उद्योगावर अवलंबून आहे. फोर्जिंगच्या उद्योगाच्या एकूण उद्योगापैकी ८० टक्के उत्पादन वाहन उद्योगाला लागते. अशावेळेस जुने तर सांभाळायचे परंतु नव्यावर लक्ष ठेवायचे, संरक्षण खात्याच्या गरजा पूर्ण करायच्या, तोफेची नळी तयार करायचीसुद्धा अवघड काम होते. भारत फोर्जने संरक्षण खात्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचा पुरवठा करण्यात कधीच हार मानली नाही. अनेक इतर कंपन्या सुरू करण्यात आल्या. काही कंपन्या बंद कराव्या लागल्या. १९७७ ला निळकंठ कल्याणी यांनी सिकॉमचे अध्यक्षपद स्वीकारले आणि महाराष्ट्र सरकारला अतिशय मोलाची मदत केली, म्हणून उद्योजक व राजकारणी यांनी एकमेकांच्या सहकार्याने प्रगती केली पाहिजे.

बाबा कल्याणी यांचा जन्म ७ जानेवारी १९४९ ला झाला. बिट्स पिलानी कॉलेजचे ते पदवीधर. जगप्रसिद्ध मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट (एमआयटी) येथे शिक्षण पूर्ण करून १९७२ साली भारत फोर्जच्या मदतीला बाबा कल्याणी आले. फक्त पित्याची इच्छा अथवा पुत्र कर्तव्य म्हणून त्यांनी हे केले नाही तर, पित्याच्या कर्तबगारीचा अभिमान व आपल्या तिसऱ्या पिढीने राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्षितिजे गाठली पाहिजेत ही महत्त्वाकांक्षा त्यांनी ठेवली. वाटचाल सुरूच आहे, बघूया पुढे काय होते ते.