-अजय वाळिंबे

ला ओपाला आरजी लिमिटेड (बीएसई कोड: ५२६९४७)

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण

वेबसाइट: http://www.laopala.in

प्रवर्तक: सुशील झुनझुनवाला

बाजारभाव: रु. ३५७ /-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : टेबलवेयर, क्रिस्टल ग्लास

भरणा झालेले भागभांडवल: रु. २२.२० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक : ६५.६४

परदेशी गुंतवणूकदार : १.४७

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार : १९.२५

इतर/ जनता : १३.६

पुस्तकी मूल्य: रु. ७४.६

दर्शनी मूल्य: रु. २/-

गतवर्षीचा लाभांश: २५०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ११.१५

किंमत उत्पन्न गुणोत्तर: २९.७

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०१

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३६.५

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: २१.९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): २२.१

बीटा: ०.६

बाजार भांडवल: रु. ३,९५९ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४८०/३२६

वर्ष १९८७ मध्ये सुशील झुनझुनवाला यांनी स्थापन केलेली ‘ला ओपाला ग्लास’ आज बहुतांशी भारतीयांना त्यांच्या नाममुद्रेमुळे आणि विविध काच उत्पादनामुळे माहिती असेल. ३५ वर्षांपूर्वी कंपनीने पहिल्या ओपल ग्लास प्रकल्पासह ओपल-वेअर उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आणि गेल्या काही वर्षांत त्याची क्षमता वाढवली. त्यानंतर वर्ष १९९६ मध्ये, कंपनीने आपला पहिला क्रिस्टल ग्लास प्रकल्प सुरू केला. कंपनी तीन दशकांहून अधिक काळ ओपल-वेअर विभागात कार्यरत असून देशांतर्गत ओपल-वेअर विभागामध्ये ला ओपाला आघाडीच्या स्थानावर आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ग्लासवेअर विभागात कार्यरत असलेल्या या कंपनीने आपल्या ओपल आणि क्रिस्टल-वेअर उत्पादनांसाठी एक मजबूत प्रतिमा विकसित केली आहे. जीवनशैलीतील वाढत्या बदलांना तोंड देण्यासाठी, कंपनीने ‘दिवा’ नाममुद्रेद्वारे आपली प्रीमियम उत्पादन श्रेणी सुरू केली. कंपनी संशोधन आणि विकास (आर अँड डी) वर लक्षणीय लक्ष केंद्रित करते आणि दरवर्षी नवीन डिझाइन सादर करते. कंपनीने उत्पादन क्षमतेत वाढ केल्यामुळे ओपल-वेअर उद्योगात कंपनी आपले नेतृत्व स्थान कायम राखेल अशी अपेक्षा आहे.

आणखी वाचा-Money Mantra : माझा पोर्टफोलियो :  पोर्टफोलियोची शान.. एशियन पेंट्स लिमिटेड

विस्तृत उत्पादन श्रेणी:

कंपनी आपली विविध ओपल-वेअर उत्पादने ‘ला ओपाला’ (इकॉनॉमी सेगमेंटची पूर्तता करते) आणि ‘दिवा’ (प्रीमियम सेगमेंटची पूर्तता करते) दोन नाममुद्रेअंतर्गत विकते आणि काचेची उत्पादने ‘सॉलिटेअर’अंतर्गत (प्रीमियम सेगमेंटची पूर्तता करते). ‘दिवा’ अंतर्गत, ‘क्लासिक’, ‘आयव्हरी’, ‘कॉस्मो’, ‘क्वाड्रा’ आणि ‘सोवराना’ या प्रमुख नाममुद्रा (ब्रँड) आहेत.

वितरण आणि विपणन व्यवस्था: कंपनी भारतातील ६००हून अधिक शहरात सुमारे २०,००० किरकोळ विक्रेते आणि २०० वितरकांच्या साखळीद्वारे आपली उत्पादने विकते. कंपनीच्या उलाढाली पैकी देशांतर्गत विक्रीचा वाटा जवळपास ९० टक्के असून उर्वरित १० टक्के निर्यातीद्वारे आहे. कंपनी जगभरातील ३० हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. कंपनीची बहुतांश विक्री त्याच्या वितरण साखळीद्वारे होते. तसेच कंपनी आपली उत्पादने मोठ्या कंपन्यांना आणि कॅन्टीन स्टोअर विभागांना थेट विक्री करते. कंपनी आपली उत्पादने प्रामुख्याने पश्चिम आशिया, ब्राझील आणि यूकेमध्ये निर्यात करते.

आणखी वाचा-Money Mantra : दिवस तुझे हे फुलायचे…

कंपनीचे डिसेंबर २०२३ अखेर सरलेल्या नौमहीचे तसेच तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले आहेत. कंपनीने गेल्या तिमाहीच्या तुलनेत कमी विक्री सध्या केली असली तरीही नफ्यात मात्र वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने १०७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४४.१५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो २७ टक्के अधिक आहे. उच्च क्षमता सितारगंजमध्ये ग्रीन फील्ड प्रकल्प सुरू झाल्यानंतर कंपनीच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाली आहे. वाढत्या मध्यमवर्गामुळे सध्या गृहनिर्माण (रिअल इस्टेट), हॉटेल आणि केटरिंग यांच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे. वाढत्या डिस्पोजेबल उत्पन्नासह, निम-शहरी क्षेत्रातूनही काचेच्या वस्तू, ज्यामध्ये सजावटीची काचेची भांडी, टेबलवेअर, दिवे, पिण्याचे कंटेनर इत्यादींना लक्षणीय मागणी आहे. वाढीव मागणीमुळे तसेच वाढीव उत्पादनामुळे रिअल इस्टेट, घरगुती आणि हॉटेल, रेस्टॉरंट्स, केटरर्स (HoReCa) विभागात कंपनी आगामी कलावधीत उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. अत्यल्प कर्ज आणि अनुभवी प्रवर्तक असलेली ‘ला ओपाला’ एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटते.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. हा गुंतवणूक सल्ला नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

stocksandwealth@gmail.com