अरविंद वकील, चंपकलाल चोकसी आणि सूर्यकांत दानी यांनी स्थापन केलेली एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी गृह सजावट आणि रंगाची निर्मिती करणारी कंपनी आहे. या ऐक्यांशी वर्ष जुन्या कंपनीच्या छत्राखाली एशियन पेंट्स, बर्जर, एपको इत्यादी प्रमुख नाममुद्रा आहेत. कंपनी गृह सजावटीच्या विविध सेवा पुरवते, यात प्रामुख्याने वॉल पेंट्स, वॉल कव्हरिंग्ज, वॉटरप्रूफिंग, टेक्सचर पेंटिंग, वॉल स्टिकर्स, मेकॅनाइज्ड टूल्स, ॲडेसिव्ह, मॉड्यूलर किचन, सॅनिटरीवेअर, लाइटिंग्ज, सॉफ्ट फर्निशिंग्स आणि पीव्हीसी विंडोज इत्यादींचा समावेश आहे. एशियन पेंट समूहाकडे एशियन पेंट्स, निलया, स्लीक, बर्जर, वेदर सील, ॲप्को, टोब्मन, कडिस्को, स्कीब इत्यादी काही आघाडीच्या नाममुद्रा आहेत. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने २५ पेटंट दाखल केले आणि त्यातील १० मंजूर झाले. कंपनीने गेल्या वर्षात २२ नवीन उत्पादने सादर केली असून आतापर्यंत कंपनीच्या नावावर एकूण ४९ पेटंट आहेत.

उत्तम ब्रॅंडिंग, अनुभवी प्रवर्तक असलेल्या या कंपनीने ३४५ अब्ज रुपयांच्या एकत्रित उलाढालीसह जगातील पहिल्या दहा डेकोरेटिव्ह कोटिंग्ज कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. एशियन पेंट्स आशियामध्ये दुसऱ्या स्थानावर असून जगातील इतर कोटिंग कंपन्यांमध्ये आठव्या स्थानावर आहे. कंपनीचे भारतात दीड लाखांहून अधिक किरकोळ विक्रेते असून ५४ ‘ब्यूटीफुल होम स्टोअर’ आहेत. एशियन पेंट्स १५ देशांमध्ये कार्यरत असून आणि जगभरातील २७ पेंट उत्पादन प्रकल्प जगातील साठहून अधिक देशांमध्ये ग्राहकांना सेवा देत आहेत. एशियन पेंट्स समूह जगभरात त्याच्या उपकंपन्यांद्वारे कार्यरत आहे यामध्ये एशियन पेंट्स बर्जर, ॲपको कोटिंग्स, एससीआयबी पेंट्स, टॉबमन्स, एशियन पेंट्स कॉजवे आणि कॅडिस्को एशियन पेंट्स इ. कंपन्यांचा समावेश होतो.

Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
Bhushan Gagrani BMC commissioner
मुंबईला मिळाले नवे आयुक्त, ‘या’ अधिकाऱ्यावर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेची जबाबदारी
megha engineering and shirke construction
मेघा इंजिनीअरिंग, शिर्के कन्स्ट्रक्शनच्या देणग्यांमध्ये ठरावीक ‘पॅटर्न’
Samsung announced Mega Offers With Holi Sale 2024 sixty percent off on smartphones tablets and laptops
सॅमसंगच्या Holi Sale ची घोषणा; स्मार्ट टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन अन् ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार बंपर डिस्काउंट

हेही वाचा – लक्ष्मीची पावले  : फंड विश्वातील अनुभवी सेनानी.. – कैलाश कुलकर्णी

गेल्या आर्थिक वर्षातील कंपनीचा महसूल खंडित पुढीलप्रमाणे आहे:

रंग-सजावटीचा व्यवसाय (८४ टक्के) यामध्ये अंतर्गत भिंत फिनिश, बाह्य भिंत फिनिश, वॉटरप्रूफिंग, वुड फिनिश, एनामेल्स, ॲडेसिव्ह, टूल्स, अंडरकोट यांचा समावेश आहे. कंपनी भारतातील ६०० हून अधिक शहरात ही सेवा पुरवते.

गृह सजावट व्यवसाय (४ टक्के) या विभागांतर्गत, कंपनी ग्राहकांना संपूर्ण ‘वन-स्टॉप होम डेकोर सोल्युशन’ प्रदान करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये मॉड्युलर किचेन्स, सॅनिटरीवेअर, लाइटिंग, पीव्हीसी विंडो, वॉल कव्हरिंग्ज, फर्निचर, सॉफ्ट फर्निशिंग यांचा समावेश आहे.

औद्योगिक कोटिंग्स (३ टक्के) या विभागात, कंपनी भारतातील ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक कोटिंग्ज व्यवसायासाठी उच्च दर्जाची सानुकूल उत्पादने प्रदान करते. यामध्ये ऑटोमोटिव्ह, मरिन आणि पॅकेजिंग कोटिंग्ज, इंडस्ट्रियल प्रोटेक्टिव्ह कोटिंग्ज, पावडर कोटिंग्स, फ्लोर कोटिंग्स आणि रस्त्याच्या खुणा यांचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय व्यवहार – ९ टक्के

कंपनीचे डिसेंबर २०२३ अखेर सरलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर केले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत उलाढालीत ५.४ टक्क्यांनी वाढ दाखवून ती ९,१०३ कोटींवर नेली आहे. तर नक्त नफ्यात ३५ टक्के वाढ होऊन तो १,४७५ कोटींवर पोहोचला आहे. वाढता मध्यमवर्ग तसेच वाढते शहरीकरण याचा थेट परिणाम गृहसजावटीवर होतो. आगामी कालावधीत कंपनीचा या क्षेत्रातील महसूल मोठ्या प्रमाणावर वाढेल अशी अपेक्षा आहे.

भांडवली खर्च आणि विस्तार योजना

कंपनीने पुढील तीन वर्षांमध्ये विविध क्षमता विस्तार तसेच काही बॅकवर्ड इंटिग्रेशन प्रकल्पांवर सुमारे ८,७५० कोटी गुंतवणुकीची योजना आखली आहे.

१. कंपनीने भारतात व्हीएई (Vinyl Acetate Ethylene Emulsion) आणि व्हीएएम (Vinyl Acetate Monomer) साठी ३ वर्षांच्या कालावधीत सुमारे २,१०० कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीसाठी उत्पादन सुविधा उभारण्याची योजना आखली आहे. उत्पादन सुविधेची स्थापित क्षमता वार्षिक एक लाख टन आणि व्हीएईसाठी वार्षिक दीड लाख टन असेल.

२. कंपनीने संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह येथे वार्षिक २.६५ लाख मेट्रिक टनची व्हाइट सिमेंट निर्मिती सुविधा स्थापन करण्यासाठी संयुक्त उपक्रमात प्रवेश केला आहे. याशिवाय, भारतातही क्लिंकर ग्राइंडिंग युनिट उभारले जातील. एकूण गुंतवणूक अंदाजे ५५० कोटी रुपये असेल, जी पुढील दोन वर्षांमध्ये गुंतवली जाईल.

३. कासना, खंडाळा, अंकलेश्वर आणि म्हैसूर येथील विद्यमान सजावटीच्या पेंट प्रकल्पांचा विस्तार

४. सुमारे २,००० कोटींच्या गुंतवणुकीत ४ लाख किलो लिटर क्षमतेसह नवीन जल-आधारित पेंट उत्पादन सुविधा स्थापन करण्याची कंपनीची योजना आहे. ही सुविधा भूसंपादनानंतर ३ वर्षांनी सुरू होणे अपेक्षित आहे.

५. कंपनीने विशेष रसायने आणि पुढच्या पिढीतील नॅनोटेक्नॉलॉजी प्लेयरमध्ये बहुसंख्य भागभांडवल मिळविण्यासाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे सर्व उत्पादनांमध्ये कंपनीची तांत्रिक क्षमता वाढेल.

हेही वाचा – बाजारातील माणसं : जुन्या व नव्याची यशस्वी सांगड.. बाबा कल्याणी

अर्थसंकल्प कसाही असो एशियन पेंट्ससारख्या आघाडीच्या दिग्गज कंपन्या आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पोर्टफोलियोची शान वाढवतात हे निश्चित!

(बीएसई कोड: ५००८२०)

वेबसाइट: http://www.asianpaints.com

प्रवर्तक: चोकसी/ दानी/ वकील

बाजारभाव: २,९३६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : होम डेकोर / रंग

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९५.९२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५२.६३

परदेशी गुंतवणूकदार १७.३२

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १०.५८

इतर/ जनता १९.४७

पुस्तकी मूल्य: रु. १७३

दर्शनी मूल्य: रु. १/-

गतवर्षीचा लाभांश: २५६५%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ५६.६९

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५१.६

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१४

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५१.९

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ४०.३

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): ३४.४%

बीटा: ०.८

बाजार भांडवल: रु. २८१,७२१ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३५६८/२६९४

गुंतवणूक कालावधी : प्रदीर्घ

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.