अनेकदा असे होते की, जे आपण बघतो ते तसे नसतेच किंवा आपल्याला जसे दाखवले जाते ते तसे कधीच नसते. जेव्हा तुमच्या मनात अशी शंका येते, तेव्हा समजावे की नक्कीच काही तरी घोटाळा आहे. असेच झाले हश पप्पीचे म्हणजे चपला बनवणारी कंपनी नव्हे तर हा एक रॅमन ओलोंरुवा अब्बास नावाचा नायजेरिअन इन्फ्लुएन्सर होता. ज्याच्या समाजमाध्यम असलेल्या इंस्टाग्राम हॅण्डलचे नाव हश पप्पी असे होते. ही कथा त्याचीच आहे.

तुमच्या-आमच्याकडे पैसे मर्यादित असतात, पण कंपन्यांकडे मुबलक रोखता असते आणि वस्तू-सेवा घेतल्यानंतर त्यांची देणीदेखील मोठी असतात. बहुतांश वेळेला हे सर्व व्यवहार ऑनलाइन होतात. एखादा ई-मेल येतो, ज्यात बिल येते जे मोठ्या किमतीचे असते आणि मग पैसेदेखील ऑनलाइन पाठवले जातात म्हणजे थेट बँक खात्यात पाठवले जातात. कंपनीला जे बिल येते त्या बरोबर बँकेचे तपशीलदेखील असणे अपेक्षित असते. ई-मेल घोटाळा करणारे हीच संधी हेरतात. कित्येक दिवस ते फक्त ई-मेल बघत असतात आणि जेव्हा अशा प्रकारचे ई-मेल येतात तेव्हा अचानक एक अजून ई-मेल कंपनीला येतो. ज्यात लिहिलेले असते की, बँकेचे जुने तपशील रद्द करावे आणि हे आता आमच्या नवीन बँकेचे तपशील आहेत. जेव्हा ई-मेल उघडला जातो, त्या वेळी तो अगदी हुबेहूबच असतो. कारण ई-मेल हॅक केले असते आणि त्यावर पैसे पाठवले जातात. मग कधी तरी फोन येतो की, पैसे मिळालेच नाहीत.

Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Compounding is only possible through mutual funds
म्युच्युअल फंडांद्वारेच चक्रवाढ लाभाची किमया शक्य
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
loksatta editorial today on recklessness of administration in pune porsche accident case
अग्रलेख : बालिश आणि बिनडोक!
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Loksatta explained The Central Reserve Bank of India has paid more than two lakh crore rupees as dividend to the central government
अग्रलेख: सोसणे-सोकावणे…

हेही वाचा >>>Money Mantra: पुनर्विकासादरम्यान मिळणाऱ्या ट्रान्झिट भाड्यावर कर भरावा लागतो का?

मग कंपनीमध्ये धावाधाव होते आणि घोटाळा उघडकीला येतो. फक्त कंपन्यांनाच फसवले जाते असे नाही तर माणसांनासुद्धा फसवले जाते. पण आपण कधी असे ई-मेलवर देयक बघून पैसे देत नाही तर आपले व्यवहार थोडेसे वेगळे आणि अर्थात कमी मूल्याचे असतात. अब्बास अशाच पद्धतीने पैसे कमवत होता. पण थोडेथोडके नाही तर कित्येक कोटी डॉलर. त्याचा उंची जीवनशैलीचा व्हिडीओ बनवणे आणि ते इंस्टाग्रामवर टाकणे हा त्याचा छंद होता. दुबईमध्ये स्थायिक झाला असला तरी आपली नायजेरियन ओळख त्याने लपवली नव्हती. त्यामुळे नायजेरियात तो एक आदर्श व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या उंची जीवनशैलीचे फोटो आणि व्हिडीओ नायजेरियातील तरुणांमध्ये चांगलेच प्रसिद्ध होते.

त्याच्यावर आरोप होते की, अमेरिकेतील एका कंपनीचे ४ कोटी डॉलर, इंग्लिश प्रीमियम लीगचे १२.४ कोटी डॉलर आणि माल्टा येथील बँकेचे १.४ कोटी डॉलर त्याने बळकावले. हे आरोपनंतर अमेरिकेतील न्यायालयात सिद्ध झाले. ८ जून २०२० ला दुबईतील पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली आणि बरीच संपत्ती जप्तसुद्धा केली. त्याला लगेचच अमेरिकेतील न्यायालयासमोर उभे करून त्याच्यावर खटला भरला. तो सध्या अमेरिकेत ११ वर्षांची शिक्षा भोगत आहे. पुढल्या वेळेला पैसे देताना थोडेसे सावधान विशेषतः तुम्ही कंपनी चालवत असाल किंवा कंपनीतर्फे पैसे देत असाल तेव्हा. जर एखादा असा ई-मेल आला की, आमचे बँकेचे तपशील बदललेले आहेत किंवा नव्या ई-मेलवरून बिल आले तर एकदा त्या व्यक्तीशी किंवा कंपनीशी संपर्क करूनच पैसे हस्तांतरित करा.

 डॉ. आशीष थत्ते @AshishThatte

ashishpthatte@gmail.com

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत.